[ad_1]

रत्नागिरी : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांच्या जुगलबंदीत राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी उडी घेतली आहे. ज्यांचं राजकारणच अजित पवारांपासून सुरू झालं, त्यांनी दादांवर बोलू नये, अशा शब्दात त्यांनी रोहित पवार यांना खडे बोल सुनावले. अजितदादांनी कंत्राटी भरतीचं समर्थन केल्याने रोहित पवार यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यावरून रुपाली चाकणकर यांनी रोहितदादांना झापले.

दापोली तालुका राष्ट्रवादी महिला आघाडी कडून आयोजित मंगळागौर कार्यक्रमासाठी त्या दापोली दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी रूपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष तथा नगरसेविका साधना बोत्रे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ पदाधिकारी अजय बिरवटकर, तालुकाध्यक्ष विनिता शिगवण, नेहा जाधव नगरसेविका रिया सावंत, रमा बेलोसे, स्मिताली राजपुरे, संदीप राजपुरे,अजय जाधव, मोहन मुळये, आदी राष्ट्रवादी महिला पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खास सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी त्यांनी महिलांसोबत फुगडी घालून या कार्यक्रमाचा उत्साह वाढवत महिलांना राज्य शासन महिलांसाठी करत असलेल्या कामाची कायद्याची माहिती दिली. महिलांनी केवळ अन्याय सहन न करता आवाज उठवायला हवा, असं त्या म्हणाल्या.

सरकारची कंत्राटी नोकर भरती तरुणांचे शोषण करणारी, निर्णय लगेच मागे घ्या अन्यथा… काँग्रेसचा एल्गार
रोहित पवार-अजित पवार यांच्यात कसा वाद झाला?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर येथे शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत बोलताना एका शासकीय कर्मचाऱ्याच्या पगारात खासगी कंपनीचे तीन कर्मचारी काम करतात. राज्याचे वार्षिक बजेट साडेपाच ते सहा लाख कोटींचे आहे. या अर्थसंकल्पापैकी २ लाख ४० हजार कोटींचा खर्च कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होतो, अशा स्वरूपाचे विधान केले होते. या वक्तव्यावर आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांची भूमिका बदललेली दिसते, याचं आश्चर्य व्यक्त करत असाच फॉर्म्युला एका आमदाराच्या आणि खासदाराच्या पगारावर लावला तर करोडो रुपयांच्या खर्चात हजारो शासकीय कर्मचारी काम करतील, असा टोला लगावला आहे. या सगळ्या वादावर रूपाली त्यांनी दोन वाक्यात प्रतिक्रिया देत आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

राज्य सरकारचा मोठा निर्णय, अधिकाऱ्यांसह महत्त्वाची पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; आरक्षणाला लावली कात्री
माझा नवरा माझ्यासाठी वडाला फेऱ्या मारतो

आम्ही महिला भगिनी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला फार फेऱ्या मारत राहतो. मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत. पण पुरुषाचा जन्म हा मृत्यूपर्यंत प्रवास आहे तसाच असतो. पण स्त्रीचा जन्म हा विविध नात्यांनी शरीराच्या विविध बदलांनी लिहिलेला असतो. मासिक पाळी, लग्न,बाळंतपण त्यावेळी होणारा त्रास, फॅमिली प्लॅनिंग, ऑपरेशन हे सगळं त्या बाईच्या आयुष्यामध्ये असतं. यामुळे साहजिकच स्त्रीची शरीराची मोठ्या प्रमाणात झीज होते. पण आम्ही कधी आमचं हिमोग्लोबिन चेक करत नाही. जसा सूर्य उगवतो-मावळतो तशी आमच्या आयुष्याचीही कधीतरी संध्याकाळ होणार आहे, हे आम्ही सर्रास विसरून जातो, पण वास्तव जीवन जगत असताना आरोग्य तपासणी करायला पैसे नसतात. आपल्या या सगळ्या संसाराच्या गाड्यात आपण आर्थिक सक्षमीकरणाकडे दुर्लक्ष करतो याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असंही त्या म्हणाल्या.

“एखाद्या वटपौर्णिमेला जाण्याअगोदर आपले हिमोग्लोबिन अगोदर चेक करून घ्या. ते फार कमी भरलं तर आपल्या नवऱ्याला सांगा, माझ्यासाठी वडाला तुम्ही फेऱ्या मारा. नक्कीच बायकोसाठी पतीलाही वडाला फेऱ्या मारायला हरकत नाही. मी अभिमानाने सांगते की, माझ्यासाठी माझा नवराही वडाला फेरे मारतो. मी बाहेर असताना मला व्हिडिओमध्ये कळालं की माझा नवरा माझ्यासाठी फेरे मारतो. मलाही खूप छान वाटले”

कंत्राटी पध्दतीने नको, सरळसेवाने नोकऱ्या दया; तरुणांची मागणी

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *