[ad_1]

प्रॉव्हिडन्स: भारताने तिसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात वेस्ट इंडिजचा सात गडी राखून पराभव करून पाच सामन्यांच्या मालिकेत जबरदस्त पुनरागमन केले. करो या मरो, अशी स्थिती असलेल्या या सामन्यात भारताला कोणत्याही परिस्थितीत जिंकणे आवश्यक होते. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने १५९ धावा केल्या. प्रत्युत्तरात एकट्या सूर्यकुमार यादवने अर्ध्याहून अधिक धावा केल्या. सूर्या ४४ चेंडूत ८३ धावा करून बाद झाला. तो ज्या प्रकारे खेळत होता, ते पाहता त्याने सहज आपला चौथा टी-२० आंतरराष्ट्रीय बनवले असते, पण हवाई शॉट खेळताना तो सीमारेषेवर झेलबाद झाला. युवा फलंदाज तिलक वर्माचेही त्याच्या दुसऱ्या सामन्यात सलग दुसरे अर्धशतक हुकले. तो ९ धावांवर नाबाद परतला तेव्हा स्ट्राइक एंडला उभा असलेला कर्णधार हार्दिक पांड्याने षटकार ठोकून विजयावर शिक्कामोर्तब केले. आता या मालिकेतील चौथा सामना १२ तारखेला फ्लोरिडा (अमेरिका) येथे होणार आहे.

सूर्याप्रमाणे तिलकही चुकला

१० चौकार आणि चार षटकारांची स्फोटक खेळी खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवला पहिल्याच षटकात क्रीझवर यावे लागले. कारण नवोदित यशस्वी जैस्वालने पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात दोन चेंडूंत केवळ एक धाव घेतली. सहा धावांवर या धक्क्यानंतर शुभमन गिल (६) ही स्वस्तात बाद झाला. येथून सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी ३४ धावांनी धावसंख्या १२१ पर्यंत नेली. दोघांमध्ये मॅच विनिंग पार्टनरशिप होती.

तिसऱ्या टी-२०साठी हार्दिकने काढले प्रभावी अस्त्र; विजय मिळून देणाऱ्या हुकमी एक्क्याचे पदार्पण
कराे या मरो

याआधी द्विपक्षीय T-२० मालिकेत टीम इंडिया १३ वेळा करो या मरोच्या परिस्थितीत अडकली होती. म्हणजेच मालिका वाचवण्यासाठी तो सामना कोणत्याही किंमतीत जिंकायचा होता. मागील १३ सामन्यांपैकी टीम इंडियाने ११ सामने जिंकले होते, तर एका सामन्याचा निकाल लागला नाही. २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेतील करो या मरोच्या सामन्यातच टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. आता येथेही विजय मिळाला आहे.

इंदापुरात खळबळ; माजी नगरसेवक, ठेकेदारावर कोयत्याने हल्ला, पोलिसांशीही आरोपीची शाब्दिक चकमक
एका वर्षानंतर ५०+ भागीदारी

तत्पूर्वी, ब्रॅंडन किंग आणि मायर्स यांनी पॉवर प्लेमध्ये ३८ धावा केल्यामुळे वेस्ट इंडिजने सातव्या षटकात ५० धावा केल्या. ऑगस्ट २०२२ नंतर टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजच्या सलामीच्या जोडीने ५० हून अधिक धावांची भागीदारी करण्याची ही पहिलीच वेळ होती. अक्षरने पुढच्याच षटकात मायर्सला बाद करत ५५ धावांची भागीदारी संपुष्टात आणली.

हिंडेनबर्गने पार बुडवले, एक गौप्यस्फोट आणि तीन अब्जाधीशांचे ₹ ८१,९७,०२,१८,००,००० नुकसान
विचित्र कारणामुळे सामना उशिरा सुरू झाला

पाऊस, खराब प्रकाश, खराब मैदान ही कारणे अनेकवेळा सामना उशिरा सुरू होण्यास कारणीभूत आहेत, परंतु या सामन्याला उशीर होण्याचे कारण कदाचित सर्वात विचित्र होते. नाणेफेकीनंतर भारतीय संघ प्रथम क्षेत्ररक्षणासाठी वेळेत मैदानावर आला. त्यानंतर अचानक खेळाडू मैदान सोडू लागले. तोपर्यंत ३० यार्ड सर्कलची रेषा काढण्यात आली नसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वर्तुळ तयार करून सामना सुरू करण्यास ग्रीन सिग्नल देण्यात आला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना उशिरा सुरू होण्याच्या या कारणाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *