[ad_1]

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कातळापूर शिवारात एका २५ वर्षीय महिलेचा मृतदेह मिळून आला होता. या अनोळखी महीलेचा खून झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून आल्याने या महिलेची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले. मृतदेहाजवळ पोलिसांना पर्समध्ये सापडलेले सॅनिटरी पॅड व पायातील पैजणांवरुन शोध सुरू केला. महिलेच्या पर्समध्ये सापडलेल्या सॅनिटरी पॅडवर फॉर यूज ओन्ली जिल्हा परिषद अहमदनगर असे लिहिलेले आढळून आल्याने पोलिसांनी त्यावरून तपासाची चक्री फिरवली आणि आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

या प्रकरणात पोलीसांनी मृतदेह हा अकोले तालुक्यात सापडल्याने तेथील गावागावात महिलेच्या ओळखीसाठी एक मेसेज तयार करुन व्हायरल केला. मात्र तरी देखील शोध लागला नाही. त्यानंतर एलसीबीची टिम थेट जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात गेली. तेथील अधिकार्‍यांकडून या सॅनिटरी पॅडची माहिती घेतली.

मुकेश अंबानींनी त्यांचे सुपर लक्झरी घर विकले?, कितीला विकली ही मालमत्ता जाणून घ्या
त्यानंतर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणार्‍या आशा सेविका, अंगणवाडी ताई अशा काही गृपवर हे पोलिसांचे मेसेज व महिलेचा फोटो पाठविण्यात आला. त्यानंतर वांबोरी येथून एक फोन आला आणि ती महिला कल्याणी महेश जाधव असल्याचे निश्चित झाले आणि पुढील तपासाला दिशा मिळत गेली.

श्वानप्रेमींसाठी खूशखबर, आता श्वान-मांजरांना मिळणार विमा; आजारपण, हरवल्यास मिळणार संरक्षण
कल्याणीचे लग्न जिल्ह्यातील राहुरी वांबोरी येथे राहणाऱ्या महेश जाधवशी झाले होते. मात्र महेश आपल्या पत्नीवर संशय घेत असे. त्यातूनच त्याने आपला भाचा मयूर अशोक साळवे (रा. राहुरी) याला बरोबर घेऊन पत्नी कल्याणीला भंडारदरा परीसरात फिरायला घेऊन गेला आणि कातळापूर परीसरात निर्जनस्थळी तिचा गळा आवळून खून करुन मृतदेह तिथेच टाकून पसार झाला होता.

हिंडेनबर्गने पार बुडवले, एक गौप्यस्फोट आणि तीन अब्जाधीशांचे ₹ ८१,९७,०२,१८,००,००० चे नुकसान
मात्र एका सॅनिटरी पॅडमुळे या खुनाला वाचा फुटली असून पोलिसांनी महेश आणि त्याचा भाचा अशोक साळवेला अटक केली आहे. त्यांनी गुन्हाही कबूल केल्याच पोलिसांनी सांगितलं. दरम्यान, अहमदनगर एलसीबीच्या या कारवाईचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *