विशाखापट्टणम: भारताने विशाखापट्ट्णम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा १०६ धावांनी पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. विशाखापट्टणम कसोटीपूर्वी टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर होती, मात्र आता विजयानंतर रोहित ब्रिगेडने या गुणतालिकेत कितव्या स्थानावर पोहोचली आहे, जाणून घ्या.

दुसऱ्या कसोटीत इंग्लंडवर १०६ धावांनी शानदार विजय नोंदवल्यानंतर भारतीय संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. म्हणजेच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारतीय संघाला तीन स्थानांचा फायदा झाला आहे.

इंग्लंडला पराभूत केल्यानंतर भारताची विजयाची टक्केवारी ५२.७७ झाली आहे. टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२५ सायकलमध्ये आतापर्यंत ६ कसोटी खेळल्या आहेत, ज्यामध्ये ३ जिंकल्या आहेत, २ कसोटी गमावल्या आहेत आणि १ ड्रॉ झाली आहे. गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर आहे. कांगारू संघाने आतापर्यंत १० कसोटी खेळल्या आहेत, ज्यात त्यांनी ६ मध्ये विजय तर ३ कसोटींमध्ये पराभव पत्करावा लागला आहे आणि १ अनिर्णित राहिली आहे. ऑस्ट्रेलिया ५५ टक्क्यांसह पहिल्या क्रमांकावर आहे.
गुणतालिकेतील टॉप ५ संघ

पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया तर दुसऱ्या क्रमांकावर भारत आहे. याशिवाय तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका आहे, ज्यांनी २ पैकी १ सामना जिंकला आहे. पुढे न्यूझीलंड चौथ्या आणि बांगलादेश पाचव्या स्थानावर आहे. न्यूझीलंड आणि बांगलादेशनेही २ पैकी १-१ सामने जिंकले आहेत.

विशाखापट्टणम येथील डॉ. वायएस राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने इंग्लंडचा १०६ धावांनी पराभव केला. सुरूवातीपासूनच या कसोटी सामन्यात भारतीय संघ वरचढ दिसत होता. रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय अगदी योग्य ठरला.

यशस्वी जयस्वालचे द्विशतक आणि शुभमन गिलच्या शतकाच्या जोरावर भारताने धावांचा डोंगर उभारला. ३९९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव केवळ २९२ धावांत गडगडला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. हैदराबादमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला होता. आता या मालिकेतील पुढचा आणि तिसरा सामना राजकोटमध्ये १५ फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *