[ad_1]

जालना : राज्यात गेल्या काही दिवसांपासून एसटीच्या अपघातांची मालिका सुरु आहे. जालना जिल्ह्यातील पुसदहून मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बसला अपघात झाला आहे. हा अपघात मंठा तालुक्यातील केंदळी गावाजवळ घडला आहे. बस मध्ये ३० ते ४० प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातग्रस्त एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी काहीजण किरकोळ जखमी झाले आहेत तर काहींना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींवर मंठा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू,काहींना जालना शासकीय रुग्णालयात आणले.

अपघात कसा घडला?

पुसदहून मुंबईला जाणाऱ्या बसचा जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील केंदळी गावाजवळ अपघात घडला आहे. मिळालेल्या माहितूनुसार समोरुन येत असलेल्या कंटेनरने अचानक ब्रेक मारल्याने बस चालकानं धडक वाचवण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात एसटी बस पुलावरून खाली घसरून हा अपघात घडल्याचे समजते आहे. बस मध्ये ३० ते ४० प्रवासी प्रवास करीत होते. या घटनेत काही जण किरकोळ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर मंठा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुणेकरांसाठी मोठी गुड न्यूज; वाहतूक कोंडीतून सुटका, चांदणी चौकातील उड्डाणपूलासह रस्त्यांचे काम पूर्ण

बसची समोरासमोर धडक, चालकांसह २९ प्रवासी गंभीर जखमी

गंभीर प्रवाशांवर जालना जिल्हा रुग्णालयात उपचार

जालना जिल्ह्यातील पुसदहून मुंबईकडे जाणाऱ्या बसला अपघात झाल्यानंतर किरकोळ जखमी असलेल्या प्रवाशांवर मंठा ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. तर, गंभीर जखमी झालेल्या काही प्रवाशांना जालना येथे जिल्हा रुग्णालयात आणले आहे. या घटनेत सुदैवाने कुठलीच जीवितहानी झाली नाही. अपघात स्थळी रुग्णवाहिका दाखल झाल्या असून मदत कार्य सुरू करण्यात आले आहे. दरम्यान अपघात स्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली असून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.काही प्रवाशांना जालना सामान्य रुग्णालयात आणण्यात आले आहे.
पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! नवीन आठ मार्गावर पीएमपीची मेट्रो फिडर सेवा होणार सुरू
दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून एसटी बसेसच्या अपघातांचे प्रमाण वाढलेलं आहे.रस्त्यावरुन प्रवास करताना वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम न पाळल्यानं आणि रस्त्यांची दुरवास्था असल्यानं अपघाताच्या घटना घडत आहेत. वाहनचालकांनी नियमितपणे वाहनांची तपासणी करुन घेऊन वाहतूक नियमांचं पालन केल्यास अपघातांचं प्रमाण कमी होऊ शकतं.

मुंबईकरांसाठी गुड न्यूज, अखेर १० टक्के पाणी कपात रद्द, महापालिकेचा मोठा निर्णय, जलसाठ्याची स्थिती जाणून घ्या

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *