मुंबई : काँग्रेस पक्षातून बाहेर पडून १० जून १९९९ साली ज्येष्ठ नेते यांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली. गेली २५ वर्ष पक्षातील सर्वोच्च नेते म्हणून देशासह राज्याचं राजकारण त्यांनी आपल्या भोवती फिरतं ठेवलं, त्याच शरद पवार यांच्याकडून पक्षफुटीनंतर पक्ष काढून घेऊन निवडणूक आयोगाने यांच्या हाती बहाल केलाय. विधिमंडळातील बहुमत लक्षात घेऊन पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्या गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिलेला आहे. या निर्णयावर काँग्रेस पक्षाने तीव्र आक्षेप घेत भाजपवर गंभीर आरोप केला आहे.नाना पटोले काय म्हणाले आहेत?राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय केंद्र सरकारने लिहून दिलेला आहे, निवडणूक आयोगाने तो फक्त जाहीर केला. काही महिन्यांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी देशात एकही प्रादेशिक पक्ष अस्तित्वात राहणार नाही असे म्हटले होते. त्यानंतर केंद्रीय गुप्तचर संस्था आणि निवडणूक आयोगाने मोदी सरकारच्या आदेशाने प्रादेशिक पक्ष संपवण्याची सुरुवात केली आहे. अगोदर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जे झाले ते लोकशाहीची हत्या करण्याचाच प्रकार आहे. मोदी सरकार आणि केवळ विरोधी पक्षच नाही तर या देशातील लोकशाही संपवत आहे.सहा महिने, दहा सुनावण्या अन् पक्ष-चिन्ह अजित पवार गटाला!अजित पवार यांनी शरद पवार यांच्या धोरणाविरोधात पाऊल उचलून २ जुलैला ४० आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी शरद पवार गटाने विरोधी पक्षात राहणार असल्याचं जाहीर केलं. आधी शरद पवार हेच आमचे अध्यक्ष आहेत असं ते सांगत होते. पण त्याआधीच अजित पवार गटाने निवडणूक आयोगाला पत्र देऊन पक्षाध्यक्षपदी अजित पवारांची निवड करण्यात आल्याचे सांगितले होते. नंतर वाद निवडणूक आयोगात गेल्यानंतर पक्षात दोन गट पडले आहेत का? याबाबत निवडणूक आयोगाची प्रक्रिया सुरू झाली. गेली सहा महिने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबतच्या सुमारे १० सुनावण्यांनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार यांना पक्ष आणि चिन्ह बहाल केलं आहे.हा सत्याचा विजय : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपेराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अधिकृत पक्षचिन्ह आणि निशाणी मिळणे हा सत्याचा विजय आहे, या निर्णयानंतर ठाण्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे जल्लोष साजरा केला असून भविष्यात अधिक जोमाने पक्ष संघटना वाढवण्यासाठी काम केले जाईल, असे मत मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते व ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *