भोपाळ: ट्रेनचा वेग कमी झाला आणि त्यातून एका महिला आणि तरुणाने काली उडी घेतली. या भयंकर घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले. हे दोघे दीर आणि वहिनी असल्याची माहिती आहे. प्रेमसंबंधातून हे दोघे घरातून पळून गेले होते. त्यांना पोलिसांनी बंगळुरुत पकडलं आणि बिहारला परत घेऊन जात होते, तेव्हा त्यांनी थेट रेल्वेतून खाली उडी घेतली.

बिहार येथील रहिवासी प्रियकर आणि प्रेयसीला पोलिसांनी बंगळुरू येथून ताब्यात घेतलं आणि त्यांना संघमित्रा एक्सप्रेस ट्रेनने परत बिहारला आणत होते. दरम्यान, बैतुलच्या मुलताई येथील चिचंडा स्थानकाजवळ या दोघांनी रेल्वेतून उडी घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला.

ट्रेनिंग संपवून नुकतीच पोस्टिंग मिळालेली; PSIला झोपेतच हार्ट अटॅक; तरुणाचा चटका लावणारा शेवट
ट्रेनमध्ये उपस्थित महिलेच्या पतीने साखळी ओढून ट्रेन थांबवली आणि बिहार पोलिसांना याबाबतची माहिती दिली. उडी मारल्याने जखमी झालेल्या दोघांना पोलिसांनी मुलताई येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. सध्या तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. तर प्रेयसीच्या डोक्यालाही दुखापत झाली आहे. ही घटना घडली त्यावेळी बिहार पोलिसांची टीम गाडीच्या एसी डब्यात होती. तर, हे दोघे दुसऱ्या डब्यात होते. यावेळी महिलेचा पतीही तिच्यासोबत होता.

बिहारमधील आरा जिल्ह्यातील रहिवासी अमित पासवान यांची पत्नी प्रियांका २५ दिवसांपूर्वी बिहारमधून दीर पंकज याच्यासोबत पळून गेली होती. त्यानंतर ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. मोबाईल लोकेशनच्या आधारे हे दोघेही बेंगळुरू येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिस महिलेच्या पतीसह बेंगळुरूला पोहोचले. तेथून पोलिस या दोघांनाही संघमित्रा एक्स्प्रेसने बिहारला परत आणत होते. दरम्यान, मुलताईतील चिचंडाजवळ दोघांनीही रेल्वेतून उडी घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला. सध्या दोघेही बैतूलमध्ये उपचार घेत आहेत.

पुण्यातील नामांकित वकिलांसोबत शांत डोक्याने प्लॅन; डोळ्यांदेखत ‘रेकी’ करुन साथीदारांनी मोहोळचा काटा काढलाSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *