[ad_1]

विशाखापट्टणम : दुसरा कसोटी सामना भारतासाठी सर्वात महत्वाचा असेल. कारण हा सामना जिंकल्यास त्यांना मालिकेत पुनरागमन करता येणार आहे. त्यामुळे या दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात तीन मोठे बदल होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
पहिला बदल…
भारतीय संघात पहिला बदल हा गोलंदाजी होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ फक्त एका वेगवान गोलंदाजासह उतरणार आहे. त्यामुळे या सामन्यात मोहम्मद सिरिजला संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पहिल्या कसोटीतही त्याला जास्त षटके दिली नव्हती. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात सिराज हा संघात नसेल. सिराजच्या जागी भारतीय संघात कुलदीप यादवचे पुनरागमन होणार आहे. कारण खेळपट्टी ही फिरकीला पोषक आहे. त्यामुळे कुलदीप हा भारतासाठी हुकमी एक्का ठरू शकतो. त्यामुळे सिराजच्या जागी कुलदीपला संधी मिळणे, हा भारतीय संघातील पहिला बदल असेल.

दुसरा बदला…
भारतीय संघात दुसरा बदल हा अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या जागी होऊ शकतो. दुखपतीमुळे जडेजा या सामन्यात खेळणार नाही. जडेजाच्या जागी भारतीय संघातील स्थान मिळवण्यासाठी दोन खेळाडू चर्चेत आहेत. जडेजा संघाबाहेल गेल्यावर सौरभ कुमारला संधी देण्यात आली होती. सौरभ हा जडेजासारखाच डावखुरा फिरकीपटू आणि धडाकेबाज फलंदाज आहे. त्यामुळे त्याला या वेळी संघात स्थान मिळू शकते. पण त्याला स्पर्धा असेल ती वॉशिंग्टन सुंदरशी. या दोघांपैकी एकाला संधी मिळणे अपेक्षित आहे. पण भारताने जर जडेजाच्या जागी फलंदाज खेळवायचा ठरवला तर सर्फराझ खानला यावेळी संधी मिळू शकते.

तिसरा बदल…
भारतीय संघात तिसरा बदल हा लोकेश राहुलच्या जागी होणार आहे. राहुललाही पहिल्या कसोटीत दुखापत झाली होती. त्यामुळे तो दुसऱ्या कसोटीत खेळणार नाही. राहुलच्या जागी भारतीय संघात रजत पाटीदारला संधी मिळेल, असे दिसत आहे. कारण रजत सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्मात आहे. त्यामुळे त्याचा या स्थानासाठी विचार होऊ शकतो. पण रजतला यावेळी स्पर्धा असेल ती सर्फराझ खाानची. कारण भारताने एकच फलंदाज संघात आणायचा ठरवला, तर भारतीय संघापुढे रजत पाटीदार आणि सर्फराझ खान यांच्यात चुरस नक्कीच पाहायला मिळेल. अनुभव पाहता सर्फराजपेक्षा रजत हा भारतीय संघात चपखल बसत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता भारतीय संघात कोणाला पदार्पण करण्याची संधी मिळते, हे पाहावे लागेल.

मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद पांड्याला, पुणेकरांच्या प्रतिक्रिया काय?

भारतीय संघात यावेळी तीन मोठे बदल होणार आहेत. त्यामुळे संघात आलेले तीन नवीन खेळाडू कशी कामगिरी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *