मुंबई : आयपीओ बाजारात ‘धूम मचाले धूम’ चालू असताना नवनवीन कंपन्या संधी कशी सोडतील? भारतीय आयपीओ बाजारातील बूमचा फायदा घेण्यासाठी आता दक्षिण कोरिया-स्थित कंपनी देखील सज्ज होत आहे. भारतीय शेअर बाजारात आत्तापर्यंत सर्वात मोठ्या आयपीओ (IPO) चा विक्रम देशातील सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी एलआयसीच्या नावावर होता, पण आता हा विक्रम लवकरच मोडला जाऊ शकतो.

भारतीय ऑटो मोबाईल क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक म्हणून दक्षिण कोरियाची कंपनी ह्युंदाईने एक मोठी योजना आखली आहे. या अंतर्गत, कंपनी यावर्षी दिवाळीपर्यंत आपला IPO लॉन्च करण्याची शक्यता आहे, ज्याचा आकार एलआयसी आयपीओपेक्षा मोठा असेल.

विक्रीचा सपाटा सुरूच! स्टॉक ढेपाळला, गुंतवणूकदारांमध्ये खळबळ; आता पेटीएमकडून आली नवीन अपडेट
तीन दशकांपासून भारतीय बाजारात
ह्युंदाईने तब्बल तीन दशकांपूर्वी भारतीय ऑटोमोबाईल बाजारात प्रवेश केला होता आणि आता दक्षिण कोरियाची ऑटो कंपनी भारतीय स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध होण्याची योजना आखत आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार ह्युंदाई आयपीओचा आकार किंवा साइझ भारतातील सर्वात मोठा IPO असू शकतो. म्हणजेच आतापर्यंतचा सर्वात मोठा भारतीय आयपीओचा विक्रम नावे केलेलया एलआयसीचा विक्रम मोडीत निघू शकतो.

LIC पेक्षाही मोठा IPO
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी, एलआयसीने मे २०२२ मध्ये २१,००० कोटी रुपयांचा देशातील सर्वात मोठा आयपीओ लाँच केला होता. अशा परिस्थितीत, अहवालानुसार बँकर्सने ह्युंदाई इंडिया कंपनीचे मूल्य $२२-२८ अब्ज इतके असल्याचा अंदाज वर्तवला असून ह्युंदाई मोटर्स ३९ अब्ज डॉलरच्या बाजार मूल्यासह दक्षिण कोरिआई मार्केटमध्ये सूचिबद्ध आहे. अशा स्थतीत, लोअर एस्टीमेटनुसार (अंदाज) ह्युंदाई आयपीओचा आकार तीन अब्ज डॉलर्स किंवा सुमारे २७,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकतो. अशाप्रकारे ह्युंदाई इंडियाचा प्रस्तावित आयपीओ भारतीय बाजारातील सर्वात मोठा IPO बनेल.

Income Tax: टीडीएस कापल्यानंतरही येईल इन्कम टॅक्सची नोटीस, करदात्यांना आयकर विभागाचा अलर्ट
दिवाळीला धमाका करणार
यावर्षी दिवाळीच्या जवळपास ह्युंदाई इंडिया आपला आयपीओ लाँच करण्याच्या तयारीत असून कंपनी या IPO अंतर्गत विकण्याची योजना आखत असलेला हिस्सा सुमारे १५^% असू शकतो आणि आकार सुमारे २७,००० कोटी रुपये असू शकतो. दरम्यान, देशातील सर्वात मोठ्या IPO बद्दल बोलायचे तर एलआयसी २१,००० कोटी रुपयांच्या इश्यू साइजसह पहिल्या स्थानावर तर १८,३०० कोटी रुपयांच्या आयपीओ साइझसह पेटीएम दुसऱ्या स्थानावर आहे.

अर्थसंकल्प पावला! अर्थसंकल्पानंतर या कंपन्यांचे शेअर तेजीत, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची पळापळ
भारतीय बाजारात ह्युंदाईचा हिस्सा किती?
ह्युंदाईच्या गाड्यांना भारतात खूप पसंत केल्या जातात परिणामी दक्षिण कोरियाच्या कंपनीचे भारतीय युनिट ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड सध्या विक्रीच्या बाबतीत भारतीय बाजारपेठेत दुसऱ्या क्रमांकावर, तर मारुती सुझुकी इंडिया पहिल्या क्रमांकावर आहे. याशिवाय सध्या विक्रीच्या बाबतीत ह्युंदाई भारतीय बाजारपेठेतील दुसरी आणि मारुती सुझुकी इंडिया पहिली मोठी कंपनी आहे.

Read Latest Business NewsSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *