[ad_1]

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीसाठा भारतीय जनता पक्षानं कंबर कसली आहे. निवडणूक जिंकून हॅट्ट्र्रिक करण्यासाठी पक्ष सज्ज झाला आहे. येत्या निवडणुकीत भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ३३५ जागा मिळतील असा अंदाज आहे. इंडिया टुडेनं केलेल्या सर्वेक्षणातून ही आकडेवारी समोर आली आहे. पण भाजपनं एनडीएच्या माध्यमातून या निवडणुकीसाठी ४०० जागांचं लक्ष्य ठेवलं आहे. त्यासाठी भाजप अमेरिकेतील त्यांच्या मित्रांची मदत घेणार आहे.

भारताबाहेरही भाजपच्या समर्थकांची संख्या मोठी आहे. अमेरिकेत ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपी नावाचा समुदाय आहे. या समुदायाकडून भारतात २५ लाख फोन कॉल्स केले जाणार आहेत. या कॉल्सच्या माध्यमातून मोदींना पुन्हा साथ देण्याचं, एनडीएला कॉल करण्याचं आवाहन करण्यात येईल. ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपीनं ३ हजारांहून अधिक जणांचं प्रतिनिधीमंडळ पाठवण्याची योजना आखली आहे. हे प्रतिनिधी भारतात पक्षाचा आणि त्यांच्या उमेदवारांचा प्रचार करतील. विशिष्ट कॉल करण्यासाठी अमेरिकेत २ डझनांहून अधिक टीम्स तयार करण्यात आल्या आहेत. विविध राज्यं आणि तिथल्या भाषांनुसार त्यांच्याकडून रणनीती आखली जाईल.
१७ दिवसांत ५ भारतरत्न; पुरस्कारांच्या माध्यमातून नेमके कोणते प्रयत्न? काय साधलं यातनं
लोकसभा निवडणूक लक्षात घेता याची तयारी आम्ही डिसेंबरपासूनच सुरू केली होती. या महिन्यात तयारीला वेग दिला जात आहे. फेब्रुवारीत आम्ही १८ राज्यांमधील २० ते २२ शहरांमध्ये कार्यक्रम सुरू करू. आम्ही केवळ ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपीच्या समर्थक आणि स्वयंसेवकांना एकत्र आणण्याचं काम करत नाही, तर सर्वसामान्य नागरिक, मोदींना पुन्हा एकदा सत्तेत पाहणाऱ्या प्रत्येकाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहोत, अशी माहिती ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपीचे यूएसए अध्यक्ष अदाना प्रसाद यांनी सांगितलं.
भाजपवर प्रभूराम प्रसन्न? लोकसभा निवडणुकीत कौल कोणाला? सर्व्हे आला, सत्ताधाऱ्यांना किती जागा?
मागील १० वर्षांत मोदी सरकारनं केलेली चांगली कामं, योजना लोकांसमोर ठेवू. आम्ही यासाठी पॉवरपॉईंटच्या स्लाईड्स आधीच तयार केल्या आहेत. त्या पीडीएफच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवल्या जातील. संपूर्ण अमेरिकेतील शहरांमध्ये चाय पे चर्चा आयोजित करण्याची तयारी सुरू आहे, असं प्रसाद म्हणाले. यामुळे एनडीए ४०० जागा पार करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *