[ad_1]

नवी दिल्ली : एक काळ होता जेव्हा गाडी खरेदी करणं लक्झरी मानले जायचे. परंतु आजच्या काळात कार घेणे प्रत्येकाची गरज बनली आहे. तुम्ही लहान खेडेगावात रहात असाल किंवा मोठ्या शहरात, नवीन पिढीचे पगारदार लोक नोकरीच्या सुरुवातीपासूनच कार घेण्यास प्राधान्य देत आहेत. मात्र गाड्यांच्या किंमती महागल्या असून बहुतेक लोक कर्जावर कार घेण्यास पसंत करत आहेत. याशिवाय जर तुम्ही कर्ज घेऊन स्वतःची गाडी घेण्याचे स्वप्न पाहत असाल, तर तुमच्या मनात पहिला प्रश्न येईल की यासाठी तुम्हाला किती बजेट लागेल, तुम्हाला किती कर्ज घ्यावे लागेल आणि एकूण खर्च किती असेल.

सध्या बाजारात जवळपास सर्वच बँका त्यांच्या ग्राहकांना कार कर्ज देतात, पण कार लोन किती घ्यायचे याबाबत लोकांमध्ये गोंधळ असतो. डाउन पेमेंट किती असावे, कार्यकाळ किती असावा असे प्रश्न मनात राहतात, त्यामुळे आज आपण या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.

अचानक पैशांची गरज भासली? पर्सनल लोन की सुरक्षित कर्ज, काय फरक आहे जाणून घ्या
कार खरेदीसाठी 20/4/10 नियम उपयुक्त ठरेल
पैशाशी संबंधित व्यवहारांमध्ये आर्थिक तज्ञांनी बनवलेले काही नियम खूप लोकप्रिय असून कार खरेदी करतानाही असाच एक नियम आहे जो 20/4/10 नियम किंवा सूत्र आहे. तुमची आवडती कार खरेदी करणे योग्य आहे की नाही किंवा गाडी खरेदी करण्यापूर्वी तुम्ही अतिरिक्त काही करायचे की नाही हे देखील हा नियम तुम्हाला सांगेल.

एज्युकेशन लोन अर्जाची प्रक्रिया जी प्रत्येक विद्यार्थ्याला माहीत असली पाहिजे
कार खरेदीचे 20/4/10 सूत्र काय आहे?

  • गाडी खरेदी करताना तुम्ही २०% किंवा त्याहून अधिक डाउन पेमेंट करण्याचे प्रयत्न करा. नियमानुसार कार लोन घेताना ग्राहकाने किमान २०% रक्कम डाउन पेमेंट भरले पाहिजे.
  • तुम्ही चार वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी कार लोन घ्या.
  • तुमचा एकूण वाहतूक खर्च (कार EMI सह) तुमच्या मासिक पगाराच्या १०% पेक्षा कमी असावा. EMI व्यतिरिक्त वाहतूक खर्चामध्ये इंधन आणि देखभाल (मेंटेनन्स) खर्चाचा देखील समावेश आहे.

कोणतंही कर्ज घेताना या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पश्चात्ताप अटळ आहे

SBIचा फेस्टिव्हल धमाका! सणासुदीच्या काळात गृहकर्जावर बंपर सवलत, तुम्हाला मिळणार का फायदा?
या टिप्समुळे सूत्राचे पालन करणे सहज होईल

  • शक्य तितकं जास्त डाऊन पेमेंट करा
  • अपग्रेडेड मॉडेल खरेदी करण्याऐवजी कारचे बेस मॉडेल खरेदी करा.
  • गेल्या वर्षीच्या उरलेल्या नवीन कार इन्व्हेंटरीचा विचार करा.
  • नवीन गाडी घेण्याऐवजी वापरलेली कार खरेदी करा
  • तुमची सध्याची कार जास्त वेळ वापर आणि नवीन कारसाठी बचत करा.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *