[ad_1]

गांधीनगर: गुजरातमधील एका भंगार व्यावसायिकानं त्याच्या घराच्या आत गोदामातील छतावर उभारलं. त्या मंदिराच्या बाहेर द्वारपाल म्हणून पंतप्रधान नरेंद्र आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे पुतळे उभारले. मोहनलाल गुप्ता असं व्यावसायिकाचं नाव आहे. गुप्ता यांनी केलेलं बांधकाम पूर्णपणे अवैध असल्याचा दावा भरुच-अंकलेश्वर शहर विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी केला. संरक्षित करण्यासाठी गुप्ता यांनी राम मंदिरात प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती लावल्या. मंदिराबाहेर पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे पुतळे उभे केले. भंगार गोदामावर उभारण्यात आलेल्या मंदिराचं उद्घाटन गुप्ता यांनी २२ जानेवारीला केलं. याच दिवशी पंतप्रधान मोदींनी अयोध्येत राम मंदिराचं लोकार्पण केलं. इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, अंकलेश्वरच्या गडखोल गावातील जनतानगर सोसायटीत राहणाऱ्या मनसुख रखसिया यांच्या तक्रारीवरुन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी इमारतीचं निरीक्षण केलं. त्यानंतर व्यावसायिकानं अवैध बांधकाम वाचवण्यासाठी शक्कल लढवली. गुप्ता यांनी कोणत्याही परवानगीशिवाय अतिरिक्त इमारत उभारल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.आवश्यक कागदपत्रं जमा करण्यासाठी भरुच-अंकलेश्वर शहर विकास प्राधिकरणानं गुप्ता यांना सात दिवसांचा अवधी दिला आहे. गुप्ता यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना वेगळाच दावा केला. जितेंद्र ओझा नावाच्या व्यक्तीकडून २०१२ मध्ये मी मालमत्ता खरेदी केली. ओझा यांनी २०१२ मध्येच गडखोल ग्राम पंचायतीकडून बांधकामाची परवानगी घेतली होती, असं गुप्ता म्हणाले. व्यावसायिक स्पर्धकांनी मंदिराविरोधात तक्रार दाखल केल्याचा आरोप त्यांनी केला. इमारतीचे काही जुने भाग हटवून मी त्यात बदल केले आहेत. व्यवसायातील माझ्या काही स्पर्धकांनी माझं घर आणि मंदिर पाडण्याची धमकी दिली आहे. त्यांनी माझ्याकडे पैशांची मागणी केली आहे, असा आरोप गुप्ता यांनी केला. तर दुसरीकडे राखसिया यांनी केलेल्या तक्रारीनुसार, गुप्ता यांनी अवैध बांधकाम करण्याआधी कोणतीही परवानगी घेतलेली नाही.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *