सांगली: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सांगली दौऱ्यावर होते. अनेक ठिकाणी त्यांचे स्वागत, सत्कार झाले. तासगावमध्ये आर आर आबांच्या कार्यकर्त्यांनी अजित दादांची भेट घेत आबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्याची विनंती केली. पण अजित पवारांनी त्यांना नम्रपणे नकार दिला. यावेळी अजित पवारांनी त्यांच्या मनातील नाराजी बोलून दाखवली.

अजित पवार सोमवारी सांगली जिल्ह्यात होते. त्यांनी जिल्ह्याचा धावता दौरा केला. त्यांनी विट्यात जाऊन दिवंगत आमदार अनिल बाबर यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन केलं. सांगलीतून परतत असताना त्यांचं अनेक ठिकाणी स्वागत झालं. तासगावच्या वेशीवर भाजप खासदार संजय पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील यांनीही अजित पवारांचं स्वागत केलं.

तासगाव बाजार समितीजवळ आल्यानंतर अजित पवारांची कार आबा पाटील गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष विश्वास पाटील, अमोल शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अडवली. आबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करा आणि आमचा सत्कार स्वीकारा, असा आग्रह त्यांनी धरला. त्यावर मी आताच सांत्वनपर भेट घेतली आहे. तीच भेट घेऊन परत निघालो आहे. अशावेळी सत्कार नको, असं म्हणत अजित पवारांनी त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला. पण कार्यकर्त्यांनी यायलाच लागतंय म्हणत जास्तच आग्रह केला.

आग्रह करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजित पवारांनी त्यांच्या खास शैलीत खडसावलं. आबांना उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, प्रदेशाध्यक्ष करण्याच्या निर्णय प्रक्रियेत माझा महत्त्वाचा सहभाग होता. तुम्ही माझ्यासोबत याल, मला साथ द्याल असं वाटलं होतं. मी तुमची वाट पाहिली. पण तुम्ही माझी काय राखली, असा सवाल अजित पवारांनी कार्यकर्त्यांना विचारला.

आबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यास आणि सत्कार स्वीकारण्यास अजित पवारांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले. यानंतर अवघ्या १०० मीटर अंतरावर अजित पवार गटाचे कार्यकर्ते आणि नव्याने नियुक्त केलेले जिल्हाध्यक्ष, कार्यकर्ते हजर होते. त्या ठिकाणी अजित पवार थांबले. त्यांनी आदर सत्कार स्वीकारला आणि पुढच्या प्रवासाला निघाले.
परिस्थिती गंभीर, शिवसैनिक खंबीर; बाळासाहेबांची ‘कवचकुंडलं’ जोमात; उद्धव परिस्थिती पालटणार?
सुमनताई पाटील, रोहित पाटील मोठ्या पवारांसोबत
माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील या शरद पवार गटात आहेत. राष्ट्रवादीचे ४० हून अधिक आमदार अजित पवारांच्या गटात गेलेले असतानाही सुमनताई यांनी शरद पवारांच्या गटात राहण्याचा निर्णय घेतला. आबा आणि शरद पवारांचे घनिष्ठ संबंध होते. त्यामुळे सुमनताई अजित पवारांच्या गटात गेलेल्या नाहीत. या निर्णयामागे काही स्थानिक राजकीय गणितंदेखील आहेत. आबांचे पुत्र रोहित पाटीलदेखील शरद पवारांसोबतच आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *