[ad_1]

शिमला: हिमाचल प्रदेशातील शिमल्यात एक भीषण अपघात झाला आहे. अपघात पाहून उपस्थितांच्या काळजाचा अक्षरश: थरकाप उडाला. छैला परिसरात एका ट्रकला अपघात झाला. या ट्रकमधून सफरचंदांची वाहतूक सुरू होती. ट्रक एका बाजूला पलटला आणि वेग जास्त असल्यानं रस्त्याला घासत पुढे गेला. या दरम्यान त्यानं अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातात पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे.अपघाताची माहिती मिळताच पोलीस पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी पाठवले. ट्रकचा ब्रेक फेल झाल्यानं अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ट्रकमध्ये सफरचंदाच्या ६०० पेक्षा अधिक पेट्या होत्या. अनियंत्रित ट्रकनं एका पाठोपाठ एक तीन वाहनांना धडक दिली. ट्रकच्या धडकेत अल्टो कारमधील पती-पत्नीचा मृत्यू झाला. मोहनलाल नेगी (५२) आणि आशा नेगी (४३) अशी मृतांची नावं आहेत. दोघे शिमल्याचेच रहिवासी होते. पोलिसांनी त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ठियोगच्या सिव्हिल रुग्णालयात पाठवले. या अपघातातून तीन जण थोडक्यात वाचले. अपघात कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.अपघातग्रस्त ट्रक नारकंडाहून सफरचंद घेऊन जात होता. ब्रेक फेल झाल्यानं चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटलं. ट्रक डाव्या बाजूला उलटला आणि वाहनांना धडक देत थांबला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. उपस्थितांपैकी एकानं ट्रकचा अपघात मोबाईलमध्ये टिपला. अपघातानंतर एकच गोंधळ उडाला.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *