[ad_1]

विशाखापट्टणम: भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून विराट कोहलीने माघार घेतली होती. विराट पहिल्या दोन कसोटी न खेळण्यामागचे खरे कारण काय आहे हे अजून समजलेले नाही. याबाबत अनेक विविध चर्चा सुरू आहेत. मात्र, कोहली कधी परतणार याची अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. भारताला १५ फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये इंग्लंडविरुद्ध मालिकेतील तिसरा कसोटी सामना खेळायचा आहे.

भारतीय संघ सध्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळत असून मजबूत स्थितीत आहे. या सामन्यानंतर टीम इंडियाला जवळपास एक आठवड्याचा ब्रेक मिळणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील उर्वरित सामन्यांसाठी विराट कोहलीच्या भारतीय संघात पुनरागमनाबद्दल अद्याप अस्पष्टता आहे आणि बीसीसीआयचे उच्च अधिकारी माजी कर्णधाराशी त्याच्या योजनांबद्दल लवकरात लवकर बोलण्याचा विचार करत आहेत.

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार कोहली सध्या देशाबाहेर आहे. तो संघात सामील होण्याच्या स्थितीत आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर किंवा बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी त्याच्याशी अधिक स्पष्टतेसाठी बोलतील अशी माहिती मिळाली आहे. कोहलीने वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता.

टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना, बीसीसीआयच्या एका सूत्राने माहिती दिली की, स्टार फलंदाज विराट कोहलीला मालिका खेळायची आहे की नाही हा त्याचा ‘कॉल’ असेल म्हणजेच हा त्याचा निर्णय असेल आणि त्याच्या निर्णयाचा आम्ही आदर करू.

कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने न खेळण्यामागचे कोहलीचे वैयक्तिक कारण म्हणजे दुसऱ्यांदा बाबा होणार आहे, त्याच्या दुसऱ्या बाळाच्या जन्मासाठी तो त्याच्या कुटुंबासोबत असल्याची माहिती त्याचा जवळचा मित्र आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा माजी सहकारी एबी डिव्हिलियर्सने त्याच्या YouTube चॅनेलवर दिली आहे.

डिव्हिलियर्स म्हणाला की कोहलीने ब्रेक घेऊन योग्य काम केले आहे. तो म्हणाला की हो, त्यांचे दुसरे बाळ जन्माला येणार आहे. हा कौटुंबिक काळ आहे आणि हा काळ त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. मला वाटते की बहुतेक लोकांचे पहिले प्राधान्य कुटुंब असते, तुम्ही यासाठी विराटला काही बोलू शकत नाही. होय, आम्ही त्याला मिस करतोय पण त्याने योग्य निर्णय घेतला आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *