पुणे: लागोपाठ येत असलेल्या पश्चिमी चक्रवातांमुळे हवेच्या वरच्या थरांत वाऱ्याचा वेग ताशी २७० ते ३०० किलोमीटर आहे. त्यामुळे यंदा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत थंडी लांबली आहे. यंदा ११ फेब्रुवारीपर्यंत राज्यात थंडी राहणार असून त्यानंतर ती निरोप घेईल, असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. ६ किंवा ७ फेब्रुवारीनंतर थंडीत वाढ होऊन ती ११ फेब्रुवारीपर्यंत राहील.
छगन भुजबळांसमोर नरहरी झिरवळ नतमस्तक, व्यासपीठावरच लोटांगण
पूर्ण जानेवारी थंडीचा राहिला आहे. प्रामुख्याने उत्तर भारतात विक्रमी थंडी राहिली. त्याचा परिणाम महाराष्ट्रावर झाला. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत यंदा राज्यात थंडीने मुक्काम ठोकला. हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांच्या अंदाजानुसार, लागोपाठ पश्चिमी चक्रवातामुळे उत्तर भारतात १२ कि.मी. उंचीवरील हवेच्या थरात ताशी २७० ते ३०० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या पश्चिमी वाऱ्याच्या झोतामुळे यंदा जानेवारीप्रमाणे फेब्रुवारीतही पंधरा दिवस थंडीचा जोर जास्त आहे.

राणे पदासाठी दारोदार भटकतील, बाळासाहेबांचा शाप खरा ठरला; भास्कर जाधवांनी किस्सा सांगितला

आगामी तीन दिवसांत कमाल आणि किमान तापमानात वाढ होऊन थंडी काहीशी कमी होण्याची शक्यता आहे. खानदेशातील नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेकडील परीक्षेत्रात तीन दिवसांत काहीसे ढगाळ वातावरण राहिलं. तसेच कोकण, मध्य महाराष्ट्रातील किमान आणि कमाल तापमानात वाढ होऊन उकाडा वाढेल.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *