नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता आहे. सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या अनेक योजना आजच्या अर्थसंकल्पातून अपेक्षित आहेत. अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. सीतारामन त्यांच्या सहाव्या अर्थसंकल्पात ३ दिवस वीक ऑफ धोरणाची घोषणा करतील, असा दावा करण्यात येत आहे.पोस्टमध्ये काय?केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांचा सहावा अर्थसंकल्प सादर करतील. उत्पादकता वाढवण्याच्या हेतूनं सरकारकडून अनेक बदल केले जाऊ शकतात. ऑफिसमधील कामाचे तास, कामाच्या वेळा आणि सुट्ट्या बदलल्या जाऊ शकता, असा दावा पोस्टमध्ये करण्यात आला आहे. ‘१ जुलैपासून कंपन्या कामाचे तास १२ पर्यंत वाढवू शकतात. कर्मचाऱ्यांना आठवड्यातून केवळ ४ दिवस काम करावं लागू शकतं. या नव्या नियमांच्या अंतर्गत कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना ३ दिवस सुट्ट्या देतील. नव्या निययांमुळे टेकहोम सॅलरी कमी होऊ शकते, पण पीएफमधील रक्कम वाढू शकते,’ असा दावा करण्यात आला आहे. अर्थसंकल्प जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर हा मेसेज बराच व्हायरल झाला आहे. ४ दिवस काम आणि ३ दिवस आराम म्हणून अनेक जण आनंदित होऊन मेसेज शेअर करत आहेत. हा मेसेज व्हायरल झाल्यानंतर पीआयबीनं एक्सवरुन स्पष्टीकरण दिलं. व्हायरल मेसेजमधील दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचं पीआयबीकडून सांगण्यात आलं आहे. अर्थमंत्र्यांनी तसा कोणताही प्रस्ताव मांडला नसल्याचं पीआयबीनं सांगितलं आहे. अर्थमंत्री अशा प्रकारची कोणतीही घोषणा करणार नसल्याचं पीआयबीनं स्पष्ट केलं आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *