ठाणे: डोंबिवलीत भर रस्त्यात कामावरून घरी परतणाऱ्या तरुणीशी लगट करण्याचा प्रयत्न करत तिची छेड काढणाऱ्या तरुणाला स्थानिक तरुणांनी चांगलाच चोप दिल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील आजदे पाडा परिसरात घडली आहे. प्रीतम असे या तरुणाचे नाव असून स्थानिकानी त्याला मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.
धक्कादायक! पतीनं पर्समधून पिस्ते काढून खाल्ले; पत्नीला राग अनावर, संतापात नवऱ्यावर चाकू हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली आजदेपाडा परिसरात राहणारी महिला काल रात्रीच्या सुमारास कामावरून घरी परतत होती. एक रोड रोमियो तिचा पाठलाग करत होता. अंधाराचा फायदा घेत या रोड रोमियोने महिलेचा गळा दाबत तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. महिलेने प्रतिकार करत आरडा ओरड सुरू केली. आरडा ओरड ऐकून स्थानिक तरुणांनी धाव घेतली. हा रोड रोमियो पळून जात असताना स्थानिक तरुणांनी त्याचा पाठलाग करत त्याला पकडून चांगलाच चोप दिला. घटनेची माहिती मानपाडा पोलिसांना देत या रोड रोमियोला पोलिसांच्या ताब्यात दिले. प्रीतम गायकवाड असे या रोड रोमियोचे नाव असून मानपाडा पोलिसांनी प्रीतमला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.

नवीन जॅकेट जुनी झाली तरी मंत्रीपद मिळेना, ठाकरेंनी भरत गोगावलेंच्या जखमेवर मीठ चोळलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रीतम हा सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा असून तो अंधेरी मरोळ येथे राहणारा आहे. तो गुरुवारी रात्री डोंबिवलीत त्याच्या नातेवाईकाकडे आला होता. महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, रात्री अकरा वाजता माऊली बंगला येथून घरी पायी जात असताना आरोपी प्रितम हा जवळ आला. त्याने महिलेच्या जवळ येत तोंडावर हात ठेवला. त्यानंतर लगट करून मानेवर नखाने ओरखडले. तसेच स्त्री मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आहे. एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने असे कृत्य केल्याने डोंबिवलीत एकच खळबळ उडाली आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *