अंकारा: पती-पत्नीमधील भांडणं ही काही नवीन नाहीत. कधी-कधी ही भांडणं इतकी वाढतात त्यांचं नातं तुटण्यापर्यंत पोहोचतं. तुर्कस्तानमधून अशीच एक विचित्र बातमी समोर आली आहे जी वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. एका महिलेने तिच्या पतीकडून घटस्फोट मागितला आहे आणि घटस्फोटासाठी तिने जी कारणं सांगितली आहेत ती किळस आणणारी आहे. पती आंघोळ करत नाही आणि दात घासत नाही म्हणून महिलेने त्याच्या विरोधात न्यायालयात घटस्फोट मागितला आहे आणि पतीपासून मला मुक्त करा अशी मागणी केली आहे.

हे प्रकरण तुर्कीचं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ए. वाय. नावाच्या महिलेने दावा केला आहे की तिचा नवरा कधीही आंघोळ करत नाही. पाच दिवस तेच कपडे घालतो. तीन-चार दिवस दातही घासत नाही. त्यामुळे त्याच्या अंगातून असह्य दुर्गंधी येते. त्याच्या जवळ राहणेही कठीण होते. इतकंच नाही तर त्याच्यासोबत काम करणाऱ्यांनीही जबाबात सांगितलं की त्याच्या घामाच्या वासामुळे त्याच्यासोबत काम करताना खूप त्रास होतो.

तसेच न्यायालयात साक्षीदार हजर केले

या महिलेने अंकारा येथील कौटुंबिक न्यायालयात केस दाखल केली असून घटस्फोटाची मागणी केली आहे. महिलेने पतीविरोधात न्यायालयात काही साक्षीही सादर केल्या आहेत. परिसरातील लोक आणि त्याच्यासोबत काम करणाऱ्या लोकांनाही कोर्टात बोलावण्यात आले आहे. तो खरोखरच अत्यंत घाणेरड्या पद्धतीने राहतो, असे या लोकांनी न्यायालयात सांगितले. पती-पत्नीने एकत्र राहून आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे, असा युक्तिवाद महिलेच्या वकिलाने केला. पण, जर त्यांनी तसे केले नाही तर दुसऱ्या पक्षाला घटस्फोट घेण्याचा पूर्ण अधिकार आहे, असंही त्यांनी कोर्टात सांगितलं.

दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला. अस्वच्छ राहत असल्याने कोर्टाने पतीला फटकारले आणि महिलेला ५००,००० तुर्की लिरा म्हणजेच अंदाजे १३.६९ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.

याआधीही घटस्फोटाची विचित्र प्रकरणं समोर आली आहेत. २०२८ मध्ये, एका तैवानच्या माणसाने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला कारण ती वर्षातून एकदाच आंघोळ करत होती. तर एका महिलेने हे कारण देत घटस्फोट मागितला की तिचा नवरा तिच्यावर जास्त प्रेम करतो.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *