[ad_1]

बाळाची काळजी आवश्यक

बाळाची काळजी आवश्यक

गरोदर असताना आईचे वजन ८ ते १२ किलोने वाढणे हे नैसर्गिक आहे. परंतु, आजकाल ज्या नवीन माता आहेत त्या वजन वाढण्याबद्दल खूप काळजी करतात. त्यामुळे त्यांना असं वाटत की हे वजन लवकर कमी झालं पाहिजे. वजन कमी करण्यामध्ये स्वतःवर किंवा बाळाच्या पोषणावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी स्वतःची व बाळाची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.

स्तनपान योग्य होण्यासाठी

स्तनपान योग्य होण्यासाठी

बाळ झाल्यानंतर महिलांनी स्वतःची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण अनेक गैरसमजुती आपल्या समाजामध्ये आढळतात. विशिष्ट पदार्थांचं सेवन केलं करू नये किंवा दात चांगले असताना सुद्धा पदार्थ द्रव स्वरूपातच सेवन करावे. अशा सगळ्या गैरसमजुती वेगळ्या करणं गरजेचे आहे.

(वाचा – इलियाना डिक्रुझने ठेवलं मुलाचं अनोखं नाव, पहिलाच फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद)

पाण्याचे योग्य प्रमाण

पाण्याचे योग्य प्रमाण

आईने योग्य प्रमाणात पाणी प्यायला हवं. आईला किमान २४ तासामध्ये ७-८वेळा पाण्यासारखी स्वच्छ लघवीला व्हायला हवी. पिवळी लघवी होत असेल तर पाण्याचे प्रमाण कमी आहे असा त्याचा अर्थ होतो. कारण आईच्या दुधामध्ये जास्त प्रमाणात पाणी असते. तेवढे अधिक पाणी पिणे व पौष्टिक व समतोल आहार घेणे आवश्यक असते.

(वाचा – मुलगी ‘देवी’च्या हृदयाला जन्मतःच होती २ छिद्रे, नेहा धुपियाशी बोलताना बिपाशा बासूचे डोळे पाणावले)

हे पदार्थ टाळा

हे पदार्थ टाळा

घराबाहेरील जंकफूड, शीतपेय टाळायला हवे. कारण दूध हे बॉडी सिक्रेशन आहे म्हणजेच आईच्या शरीरातून बाहेर येणारे स्त्राव आहे. त्यामुळे आई जे खाणार त्यानुसार त्या स्रावाची निर्मिती होते. त्यानुसार त्यामध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट, फॅट, पोषक तत्वांचे प्रमाण असते. त्यामुळे आईने पौष्टिक घरगुती, सकस अन्नाचे सेवन करणे फायद्याचे ठरते.

(वाचा – मुलांना सक्षम बनविण्यासाठी असे करावे पालन पोषण, सुधा मूर्तींच्या सोप्या टिप्स)

स्तनपान योग्य होण्यासाठी काय जेवावं

स्तनपान योग्य होण्यासाठी काय जेवावं

भारतामध्ये प्रत्येकाच्या परंपरा वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे जे काही पारंपरिक पौष्टिक पदार्थाचे सेवन केले पाहिजे. २ वेळा व्यवस्थित जेवण आणि २ वेळा नाश्ता केला पाहिजे. आणि मधल्या वेळेत फळे, सुका मेवा खायला हवा.

दूध वाढण्यासाठी सुद्धा काही नैसर्गिक गोष्टी आहेत त्यामध्ये हाळीव, मेथी किंवा बाजरी सारखे पारंपरिक पदार्थ आहेत ज्यामुळे दूध वाढायला मदत होते. आणि स्वतःचे पोषण वाढते आणि बाळाला पोषक मूल्ये दुधातून मिळतात.

समतोल आहार हवा

समतोल आहार हवा

जर तीने आहार व्यवस्थित घेतला नाही तर तिच्या शरीरातील आयर्न, जीवनसत्त्वे, मिनरल्स हे सगळे व्यवस्थित न मिळाल्याने हाडे ठिसूळ होऊन कंबर दुखणे, पाठ दुखी किंवा गुढगे दुखणे यांसारख्या व्याधी सुरु होतात. त्यामुळे पोषक आणि समतोल आहार घेणे गरजेचे आहे.

काम करणाऱ्या महिलांना नेहमीच सहकार्य करणे गरजेचं आहे कारण त्यांना बाळाकडेही बघायचे असते, त्याला दूध पाजायचे असते, त्याचसोबत कुटुंबाकडे आणि ऑफिसही बघायचे असते. आणि हे सगळं करण्या मध्ये त्यांची प्रचंड ओढाताण होते. त्यामुळे बऱ्याचदा स्वतःकडेही दुर्लक्ष होते. त्यामुळे कुटुंबातील इतरांनी काम करणाऱ्या महिलेला मदत करणे अत्यंत गरजेचे आहे.

असे करावे व्यवस्थापन

असे करावे व्यवस्थापन

जसं की, घरच्यांनी गरोदर असताना या स्तनपान करण्याचे महत्व सांगून दिले पाहिजे. पहिल्या ६ महिन्यात फक्त आईचेच दूध देणे खूप फायदेशीर ठरते. पुढे किमान २ वर्ष ते कायम ठेवायला हवे.

प्रसूती झाल्यानंतर वैद्यकीय सेवकांनी मातेला कशाप्रकारे शरीराची स्थिती असायला हवी, बाळाला कसं पकडायला हवं, स्तनाग्रे बाळाच्या तोंडामध्ये कशाप्रकारे दिली पाहिजेत त्याची योग्य पद्धत समजावून सांगायला हवी.

काम करताना काय करावे

काम करताना काय करावे

ज्यावेळी ६ महिन्यानंतर ती कामाला पुन्हा रुजू होते तेव्हा, दर २ ते ३ तासांनी स्तन रिकामे करणं फार गरजेचे असते. त्यामुळे तिथे दूध पाजण्यासाठी आणि काढण्यासाठी जागा असणे गरजेचे आहे. जर २-३ तासांनी दूध काढले नाही तर एफआयएलच्या (feedback inhibitor of lactation) मुळे स्तन घट्ट होऊन अवरोधिक संकेत जातात त्यामुळे दुधाचे सिक्रेशन कमी होतात.
असे करण्यासाठी पाणी, साबण, सॅनिटायझर, नॅपकिन अशी स्वच्छतेची सोय असावी

  • दूध काढून ठेवण्यासाठी कंटेनर असले पाहिजेत. शिवाय ते साठवून ठेवण्यासाठी रेफ्रिजरेटर अशा सुविधा असल्या पाहिजेत
  • त्यासाठी हिरकणी कक्ष स्थापन करणे गरजेचे आहे. कारण, बाळ आजारी पडले तर पुन्हा तिला रजा घ्याव्या लागतात त्यामुळे कामावरही आणि ही बाळावर परिणाम होऊ शकतो.
  • यामध्ये तिच्या सहकारी कर्मचारी, वरिष्ठ आणि कुटुंबातील सर्वानी मदत करणे गरजेचे आहे. ज्यामुळे सुदृढ राहील आणि पुढे चांगले आरोग्यदायी आणि आनंदी आयुष्य जगू शकेल.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *