[ad_1]

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी, भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) मध्ये सर्व वयोगटातील लोकांसाठी पॉलिसी उपलब्ध आहेत. देशभरातील कोट्यवधी लोकांनी एलआयसीच्या वेगवेगळ्या पॉलिसींमध्ये गुंतवणूक केली आहे. या वर्षी म्हणजे २०२३ मध्ये एलआयसीची एक योजना लोकांमध्ये खूप लोकप्रिय झाली, तिचे नाव आहे जीवन आझाद पॉलिसी. एलआयसीने जानेवारी २०२३ मध्ये LIC जीवन आझाद योजना लाँच केली, ज्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि लॉन्च केल्याच्या अवघ्या १५ दिवसांत ५०,००० जीवन आझाद पॉलिसीची विक्री झाली.

आता जीवन आझाद पॉलिसी इतके विशेष काय आहे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल, तर चला आम्ही तुम्हाला त्याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया.

एकदाच पैसे गुंतवा अन् पेन्शन स्वरुपात मिळेल जबरदस्त रिटर्न्स; जाणून घ्या सविस्तर माहिती
एलआयसी जीवन आझाद पॉलिसी काय आहे?
LIC ची जीवन आझाद ही एक नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेट, वैयक्तिक, बचत जीवन विमा पॉलिसी असून यामध्ये विमाधारक व्यक्तीला मॅच्युरिटी कालावधीपर्यंत जीवन विम्याची सुविधा मिळते, तर एंडोमेंट प्लॅनप्रमाणे परिपक्वतेवर एक निश्चित रक्कम देखील मिळते. तसेच ही मर्यादित प्रीमियम एंडोमेंट योजना आहे ज्या अंतर्गत प्रीमियम पेमेंट प्लॅन (PPT) पॉलिसी टर्म वजा ८ वर्षांच्या समान आहे. म्हणजेच, जितक्या वर्षांसाठी पॉलिसी घेतली गेली आहे त्यापेक्षा ८ वर्षे कमी प्रीमियम भरावा लागेल. समजा पॉलिसी २० वर्षांसाठी घेतली असेल तर प्रीमियम फक्त १२ वर्षांसाठी भरावा लागेल.

अशाप्रकारे १८ वर्षे जुन्या पॉलिसीसाठी १० वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल आणि प्रीमियम भरण्यासाठी तुम्हाला मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

कमी पैशांमध्ये जास्त रिटर्न देऊन श्रीमंत करणारी धमाकेदार योजना; फायदे वाचून करा गुंतवणूक
एलआयसी पॉलिसी खरेदीचे वय
१५ ते २० वर्षासाठी कोणतीही व्यक्ती जीवन आझाद पॉलिसी खरेदी करू शकते. तर ९० दिवस ते ५० वर्षे वयोगटातील कोणीही या योजनेत गुंतवणूक करू शकते. जीवन आझाद पॉलिसीच्या मॅच्युरिटीनंतर गुंतवणूकदारांना हमी परतावा मिळतो आणि ही पॉलिसी घेण्याची वयोमर्यादा बदलत राहते.

सरकारी योजना तुम्हाला बनवणार श्रीमंत! दरमहा ८३३ रुपयांची गुंतवणूक करून व्हा कोटींचे मालक
१८, १९ आणि २० वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी योजना तीन महिन्यांसाठी म्हणजे ९० दिवसांसाठी घेतल्या जाऊ शकतात. याशिवाय १६ वर्षांची योजना दोन वर्षे ते ५० वर्षे वयोगटातील व्यक्ती खरेदी करू शकतात. तसेच तीन वर्षे ते ५० वर्षे वयोगटातील व्यक्ती ही पॉलिसी १५ वर्षांसाठी खरेदी करू शकते. समजा ३० वर्षांच्या व्यक्तीने जीवन आझाद योजना १८ वर्षांसाठी घेतली तर दोन लाखांच्या विमा रकमेसाठी पॉलिसीधारकाला १० वर्षांसाठी १२,०३८ रुपये जमा करावे लागतील.

Read Latest Business News

नॉमिनी सुविधाही उपलब्ध
जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास ‘मूलभूत विमा रक्कम’ किंवा पॉलिसी घेताना निवडलेल्या वार्षिक प्रीमियमच्या ७ पट नॉमिनीला दिले जाते. तथापि यासाठी अट म्हणजे की मृत्यूच्या तारखेपर्यंत भरलेला एकूण प्रीमियम १०५ टक्क्यांपेक्षा कमी नसावा.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *