[ad_1]

विशाखापट्टनम: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वालने कमाल केली. वयाच्या २२व्या वर्षी यशस्वीने अशी कामगिरी केली जी अनेक दिग्गजांना करता आली नाही. एसीए-वीडीसीए स्टेडियमवर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी यशस्वीने २७७ चेंडूत द्विशतक झळकावले. तो २०९ धावांवर बाद झाला. यशस्वीच्या या खेळीने अनेक विक्रम मागे पडले.

१)यशस्वी जयस्वालने भारतीय भूमीवर सर्वात कमी वयात द्विशतक करण्याचा युवा सलामीवीर होण्याचा मान मिळवला आहे. यशस्वीने ही कामगिरी २२ वर्ष ३७ व्या दिवशी केली.

२)कसोटीत भारतासाठी सर्वात कमी वयात द्विशतक करण्याचा विक्रम विनोद कांबळीच्या नावावर आहे. १९९३ साली २१ वर्ष आणि ३५व्या दिवशी इंग्लंडविरुद्ध विनोदने ही कामगिरी केली होती. आता यादीत यशस्वीचे नाव देखील आले आहे. तो भारताकडून कसोटीत द्विशतक करणारा चौथा युवा फलंदाज ठरला आहे.

विनोद कांबळी- २१ वर्ष ३५ दिवस- इंग्लंडविरुद्ध २२४
विनोद कांबळी- २१ वर्ष ५५ दिवस- झिम्बाब्वेविरुद्ध २२७
सुनील गावस्कर- २१ वर्ष २८३ दिवस- वेस्ट इंडिजविरुद्ध २२०
यशस्वी जयस्वाल- २२ वर्ष ३७ दिवस- इंग्लंडविरुद्ध २०९ धावा

३) यशस्वी भारताकडून कसोटीत द्विशतक करणारा चौथा डावखुरा फलंदाज ठरला आहे. याआधी सौरव गांगुली, विनोद कांबळी आणि गौतम गंभीर यांनी ही कामगिरी केली आहे.

४) भारतासाठी सर्वात कमी डावात द्विशतक करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत यशस्वीचा समावेश झाला आहे. यशस्वीने १० डावात ही कामगिरी केली. या यादीत करुण नायर अव्वल स्थानी आहे, त्याने फक्त ३ डावात द्विशतक केले होते. चेतेश्वर पुजारने ९, सुनील गावस्कर यांनी ८, मयांक अग्रवालने ८ तर विनोद कांबळीने ४ डावात द्विशतक केले होते.

५) भारताकडून कसोटीत एकूण २४ फलंदाजांनी द्विशतकी खेळी केली आहे. यात विरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, विराट कोहली, चेतेश्वर पुजार, आदी खेळांडूचा समावेश होतो. या यादीत आता यशस्वीचा समावेश झाला असून भारताकडून द्विशतक करणारा तो २५वा खेळाडू ठरला आहे.

६) यशस्वी २०९ धावांवर बाद झाला. डाव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये ही चौथी सर्वोच्च खेळी आहे. आज यशस्वीने गौतम गंभीरला मागे टाकले, त्याने २००६ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०६ धावा केल्या होत्या. या विक्रमाबाबत सौरव गांगुली अव्वल स्थानी आहे. त्याने २००७ साली बेंगळुरूविरुद्ध २३९ धावा केल्या होत्या. गांगुलीचा हा विक्रम आजवर कोणी मोडू शकले नाही.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *