[ad_1]

Cholesterol हा फॅटचा एक प्रकार आहे, जो शरीराच्या कार्यासाठी आवश्यक आहे. कोलेस्टेरॉल हे दोन प्रकारचे असते, LDL Cholesterol (लो डेन्सिटी लिपोप्रोटीन) आणि HDL Cholesterol (हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन) होय. एलडीएलला ‘Bad Cholesterol’ असेही म्हणतात. शरीरातील रक्तामध्ये एलडीएल कोलेस्टेरॉल जमा होते, जे हळूहळू महत्त्वाच्या रक्तवाहिन्यांमध्ये साचते आणि त्यांना ब्लॉक करते, ज्यामुळे हृदयविकार किंवा Heart Attack चा धोका वाढतो. एचडीएल कोलेस्टेरॉलला ‘Good Cholesterol’ असेही म्हणतात आणि ते रक्तात साचलेले एलडीएल म्हणजेच वाईट कोलेस्टेरॉल काढून टाकते. खराब कोलेस्टेरॉलमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो, जसे की ह्रदयात ब्लॉकेजेस, हार्ट रेट कमी होणं आणि हार्ट अटॅक अशा समस्या होतात.यामुळे उच्च रक्तदाब होतो. ज्यामुळे किडनी, हृदय आणि इतर अवयवांचे नुकसान होऊ शकते. कोलेस्टेरॉलमुळे वजन वाढण्याचा धोका वाढतो. त्यामुळे हार्ट अटॅक आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. नोएडा येथील E-260 सेक्टर 27 मध्ये असलेल्या कपिल त्यागी आयुर्वेद क्लिनिकचे संचालक डॉ. कपिल त्यागी यांच्या मते, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अनेक औषधे आणि उपचार उपलब्ध आहेत, पण तुम्ही आयुर्वेदाची मदत देखील घेऊ शकता. आयुर्वेदामध्ये ‘बॅड’ कोलेस्ट्रॉलवर उपचार करण्यासाठी अनेक नैसर्गिक उपाय आणि आयुर्वेदिक पद्धती सांगितलेल्या आहेत. (फोटो सौजन्य :- iStock)

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *