[ad_1]

नवी दिल्ली: Infinix GT 10 Pro 5G Sale: इन्फिनिक्सनं काही दिवसांपूर्वी आपला पहिला गेमिंग स्मार्टफोन Infinix GT 10 Pro 5G भारतात लाँच केला होता. आज ह्या स्मार्टफोनची विक्री सुरु होईल 108MP कॅमेरा, ट्रान्सपरंट बॅक पॅनल डिजाईन असलेल्या ह्या गेमिंग स्मार्टफोनची विक्री आजपासून केली जाईल. विशेष म्हणजे कंपनी ह्या स्मार्टफोनच्या खरेदीवर युजर्सना बँक डिस्काउंट, कॅशबॅक इत्यादींचा लाभ घेता येईल, त्या जाणून घेऊया.

Infinix GT 10 Pro 5G चा पहिला सेल

Infinix GT 10 Pro 5G ची विक्री आज दुपारी 12 वाजता ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart च्या माध्यमातून केली जाईल. ह्या स्मार्टफोनच्या एकमेव व्हेरिएंटमध्ये 8GB RAM आणि 256GB स्टोरेज देण्यात आली आहे. फोनची किंमत 19,999 रुपये आहे आणि पहिल्या सेलमध्ये 2,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवर मिळेल.

Infinix GT 10 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स

Infinix GT 10 Pro मध्ये नथिंग फोन 2 प्रमाणे ट्रान्सपरंट बॅक पॅनल देण्यात आला आहे. ज्याला कंपनीनं सायबर मेका असा नाव दिलं आहे. स्मार्टफोनच्या मागे मिनी एलईडी लाईट्स आहेत. ज्या नोटिफिकेशन आल्यावर ब्लिंक होतील. तसेच अन्य नोटिफिकेशन देखील देतील.

वाचा : OnePlus आयुष्यभर मोफत बदलणार स्मार्टफोनचा डिस्प्ले; निवडक युजर्सना लाइफटाइम वॉरंटी

Infinix GT 10 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा FHD+ डिस्प्ले 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट तसेच 10-bit कलर्स आणि 120Hz रिफ्रेश रेट देखील आहे. कंपनीनं फोनमध्ये पंचहोल डिजाईनचा वापर केला आहे.

Infinix GT 10 Pro मध्ये MediaTek Dimensity 8050 प्रोसेसर मिळतो, जोडीला 8GB RAM आणि 256GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोनचा RAM व्हर्च्युअली एक्सपांड करता येतो. तर इंटरनल मेमरी वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्डचा स्लॉट देण्यात आला आहे. हा फोन Android 13 वर आधारित XOS 13 वर चालतो.

Infinix GT 10 Pro च्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 108 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी कंपनीनं 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

यात कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ, USB Type C, Wi-Fi आणि 3.5mm ऑडियो जॅक देखील मिळेल. इनफिनिक्सच्या ह्या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी मिळते, जोडीला 45W फास्ट चार्जिंग मिळते. हा फोन सायबर ब्लॅक आणि मिराज सिल्वर रंगात विकत घेता येईल.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *