[ad_1]

नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारचे कर्मचारी आतुरतेने महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलतीची (DR) वाट पाहत असून १ जानेवारी २०२४ पासून वाढीव भत्ता मिळणार आहे. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना ५०% महागाई भत्ता मिळेल. AICPI निर्देशांक कामगार ब्युरोने आकडेवारी जाहीर केली असून निर्देशांकानुसार, ५०% महागाई भत्त्याची पुष्टी झाली. मात्र, निर्देशांकात किंचित घट नोंदवण्यात आली मात्र, महागाई भत्त्यावर कोणताही परिणाम होणार नाही. लक्षात घ्या की महागाई भत्ता ५० टक्क्यांच्या पुढे गेला असून सलग चौथ्यांदा महागाई भत्त्यात ४% वाढ अपेक्षित आहे.

Union Cabinet Decision: मोफत रेशन योजनेसह आता…, मोदी सरकारचा गरिबांसाठी मोठा निर्णय
AICPI निर्देशांक घसरला
एआयसीपीआय निर्देशांकानुसार आता लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ५०% दराने महागाई भत्त्याचा लाभ दिला जाईल, असं डिसेंबरच्या AICPI निर्देशांकाच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले. तथापि, डिसेंबरमध्ये निर्देशांक ०.३ अंक घसरून १३८.८ अंकांवर असला तरी यामुळे महागाई भत्त्याच्या आकड्यांमध्ये फारसा फरक पडलेला नाही आणि अपेक्षेप्रमाणे महागाई भत्ता ५० टक्क्यांच्या वर पोहोचला आहे. आता महागाई भत्ता ५०.२८% झाला परंतु, सरकारी दशांश ०.५० च्या खाली आहे, त्यामुळे केवळ ५०% फायनल असेल. अशा प्रकारे, महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ होणार हे निश्चित मानले जात आहे.

Union Budget 2024: खुल जा सिम सिम! अर्थसंकल्पात ४ जाती केंद्रस्थानी, यावेळी बजेटमध्ये कोणाला काय मिळालं?
वाढीव DA कधीपासून मिळणार?
केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव ५० टक्के दराने महागाई भत्ता मिळेल, पण अद्याप त्याची घोषणा होण्याची शक्यता कमी आहे. निवडणुकीचे वर्ष असल्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच कर्मचाऱ्यांना वाढीव DA मंजूर केला जाऊ शकतो. सहसा सरकार मार्चमध्ये होळीच्या आसपास महागाई भत्त्याबाबत घोषणा करते, त्यामुळे यंदाही असच अपेक्षित आहे. परंतु, कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०२४ पासून वाढीव DA चा लाभ मिळेल. म्हणजे नवीन महागाई भत्ता १ जानेवारीपासूनच लागू होईल. याशिवाय जानेवारी आणि फेब्रुवारीच्या थकबाकीसह मार्च महिन्याच्या पगारात वाढलेला महागाई भत्ता मिळू शकतो.

Stock Market: आरबीआय ॲक्शन इफेक्ट! बाजार उघडताच Paytm शेअर्स तोंडघशी, गुंतवणूकदार धास्तावले
५० टक्क्यानंतर शून्य होईल DA
जानेवारी २०२४ पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव DA चा लाभ मिळेल, पण त्यांनतर महागाई भत्ता शून्यावर येईल आणि नंतर पुन्हा शुन्यापासून महागाई भत्त्याची गणना केली जाईल. कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ५०% DA जोडला जातो. उदाहरणार्थ एका कर्मचाऱ्याच्या पे बँडनुसार (पगार रचना) किमान मूळ वेतन १८,००० रुपये असेल तर पगारात ९,००० रुपयांच्या ५०% रक्कम (महागाई भत्ता) जोडली जाईल.

Read Latest Business News

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *