[ad_1]

कोलकाता : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ सुरू होण्यास अवघे काही महिने उरले आहेत. BCCI ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्याच्या तयारीत व्यस्त आहे, मात्र त्याच दरम्यान कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. ईडन गार्डन्स स्टेडियमच्या ड्रेसिंग रूममध्ये आग लागली. अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री ११.५० वाजता आग लागली. शॉर्टसर्किटने आग लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. आग मोठी होती आणि ती आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला एक तासापेक्षा जास्त वेळ लागला.

या आगीच्या घटनेमुळे ड्रेसिंग रूमचे फॉल्स सिलिंग बरेच जळून खाक झाले आहे. याशिवाय ड्रेसिंग रूममध्ये ठेवलेले बरेच सामानही जळून खाक झाले. त्याचवेळी क्रिकेटपटूंनी वापरलेली उपकरणे खराब झाली. या आगीच्या घटनेनंतर संपूर्ण ईडन गार्डनचा संपर्क तुटला आहे. काही दिवसांपूर्वी आयसीसीच्या टीमने ईडन गार्डन्सला भेट दिली होती. बंगालच्या क्रिकेट असोसिएशननेही स्टेडियमच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत आयसीसीसमोर अहवाल सादर केला होता, त्यावेळेस सगळे लबेल होते. मात्र आगीच्या घटनेने आता चिंता वाढली आहे. मात्र, आग कशी लागली, याचा तपास सध्या सुरू आहे.

अहवालानुसार आग खूप मोठी होती, त्यामुळे मोठी दुर्घटना घडू शकली असती, मात्र अग्निशमन दलाच्या जवानांच्या सतर्कतेमुळे तातडीने कारवाई करण्यात आली, त्यामुळे आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात आले. यामध्ये क्रिकेटपटूंच्या ड्रेसिंगमध्ये ठेवलेल्या अनेक संस्मरणीय वस्तू जळून खाक झाल्याची बातमी समोर आली आहे.

विश्वचषकाचे ५ सामने ईडन गार्डन्सवर
कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमला आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये पाच सामन्यांचे यजमानपद मिळाले आहे. या पाचपैकी एक सामना उपांत्य फेरीचा आहे. ईडन गार्डन्स मैदानावर पहिला सामना २८ ऑक्टोबर रोजी नेदरलँड आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे, तर दुसरा सामना ३१ ऑक्टोबर रोजी पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. त्याचबरोबर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ५ नोव्हेंबरला तिसरा सामना होणार आहे. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात ११ नोव्हेंबरला सामना होणार आहे तर दुसरा उपांत्य सामना १६ नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *