[ad_1]

ठाणे: शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर हिललाईन पोलिस ठाण्यातच गोळीबार केलेले भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. हिल लाईन पोलिस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा शेतकऱ्यांनी दाखल केला आहे. आमदार गणपत गायकवाड यांच्यासह आठ जणांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. सध्या न्यायालयाने गणपत गायकवाड यांना १४ फेब्रुवारीपर्यंत ११ दिवासांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

द्वारली गावातील जमीन मालकाला जातीवाचक शब्द वापरल्याने आमदार गणपत गायकवाड यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिल लाईन पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार गणपत गायकवाड यांनी ३१ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता जातीवाचक शिवीगाळ केली, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्यासह जितेंद्र पारीक, विठ्ठल चिकणकर, शिवाजी फुलोरे, सौरभ सिंग, छोटू खान, चंद्रकांत ओल, नगेश वारघेट यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिस या प्रकणाचा तपास करत आहेत.

आमदारसाहेब, ‘लग्न करायचंय का’?, लोकप्रतिनिधींना ‘कॉल पे कॉल’; नेमकं प्रकरण काय?
महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार

शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड आणि भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या जमिनीचा वाद होता. गेल्या काही दिवसांत हा वाद विकोपाला गेला होता. हा वाद सोडवण्यासाठी शुक्रवारी (२ फेब्रुवारी) रात्री महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड हे पोलिस ठाण्यात पोहोचले होते. मात्र, तिथे यांचा वाद काही सुटला नाही. उलट वाद इतका वाढला की गणपत गायकवाड यांनी थेट महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या.

या गोळीबारात महेश गायकवाड हे गंभीर जखमी झाले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. पोलिसांनी या प्रकरणात गणपत गायकवाड, हर्षल केणे, संदीप सर्वांकर या तिघांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे.

पक्षाचा विचार न करता दोषींवर कडक कारवाई होणार; गणपत गायकवाड प्रकरणी देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

कोण आहेत गणपत गायकवाड?

गणपत गायकवाड विधानसभेत कल्याण पूर्व मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. ते २००९ पासून आमदार आहेत. २००९ मध्ये शिवसेनेच्या उमेदवाराचा २४ हजार ४८६ मतांनी पराभव करत गायकवाड पहिल्यांदा आमदार झाले होते. त्यावेळी ते अपक्ष म्हणून लढले होते. त्या निवडणुकीत कल्याण पूर्वेत शिवसेना दुसऱ्या, तर काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर होती.

सावत्र आईकडून अमानवीय मारहाण, ९ वर्षांची चिमुकली गवतात सापडली अन् काहीच तासात मृत्यू

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *