ब्राझिलिया: अनेक वेळा लोक एकमेकांना काही खास गोष्टी भेट म्हणून देतात. पण, यामुळे कुणाला आपला जीव गमवावा लागू शकतो असा कधी कोणी विचारही केला नसेल. असंच काहीसं या व्यक्तीसोबत घडलं. ब्राझीलच्या एका व्यक्तीला त्याच्या मित्राने एक भेट दिली. याच भेटीमुळे त्याचा मृत्यू झाला. मॅग्नो सर्जियो गोम्स नावाच्या या व्यक्तीचा भेट म्हणून मिळालेला विषारी पफरफिश खाल्ल्याने मृत्यू झाला.या एकट्या माशात ३० लोकांचा जीव घेण्याइतके विष असते. म्हणून, हा मासा खाण्यापूर्वी तो एका विशिष्ट पद्धतीने स्वच्छ करणे आवश्यक असते. न्यूजफ्लॅशच्या रिपोर्टनुसार, मृताची बहीण मायरियन गोम्स लोप्सने सांगितले की, मॅग्नोने याआधी कधीही पफरफिश साफ केला नव्हता. तसेच, त्याला हे माहित नव्हते की हा खास मासा शिजवण्याआधी विशेष प्रकारे आणि काळजीपूर्वक स्वच्छ करणे आवश्यक आहे. मॅग्नोच्या मित्राने हा मासा त्याला भेट म्हणून दिल्याचं सांगितलं जात आहे.मायरियनने सांगितले की, या प्रजातीच्या माशाला यापूर्वी कधीही शिजवलेले नसले तरी मॅग्नोने हा मासा शिजवून खाल्ला. त्याने फक्त माशाचे यकृत बाहेर काढले, ते उकळले आणि लिंबाच्या रसासोबत खाल्ले. ते खाल्ल्याच्या तासाभरातच मॅग्नो गंभीर आजारी पडला. मॅग्नोचा चेहरा सुन्न होऊ लागला. घाबरून तो स्वत: गाडी चालवत दवाखान्यात गेला, जिथे ८ मिनिटांतच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला.यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोलने नोंदवले की मॅग्नो यांच्या शरीरात टेट्रोडोटॉक्सिन आढळून आळे. हे अत्यंत घातक विष आहे जे पफरफिश आणि इतर समुद्री प्रजातींमध्ये आढळते. हे विष, ब्लोफिशद्वारे शिकारींना दूर ठेवण्यासाठी वापरले जाते. हे विष सायनाइडपेक्षा १,००० पटीने अधिक प्राणघातक आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *