मुंबई : राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्यू प्रकरणाबाबत माहिती दिली आहे. अभिषेक घोसाळकर यांच्यासंदर्भात काल घडलेली घटना अत्यंत दु:खद आहे. युवा नेत्याचं अशा प्रकारे निधन व्हावं हे अतिशय गंभीर आहे. या प्रकरणाला काही लोक राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करतात हे योग्य नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

२०२४ मध्येही मॉरिस आणि अभिषेक घोसाळकर यांचे एकत्र फोटो पाहिलेले आहेत. यापूर्वी त्यांनी अनेक वर्षे एकत्र काम केलेलं आहे. कोणत्या विषयातून त्यांचा बेबनाव झाला त्यातून मॉरिसनं गोळ्या मारल्या, याची चौकशी सुरु आहे. बऱ्याच गोष्टी पोलिसांसमोर आलेल्या आहेत. त्याची वेगवेगळी कारणं समोर येत आहेत, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. कालची घटना गंभीर आहे, अशा घटनेचं राजकारण करणं योग्य नाही. या घटनेमुळं कायदा व सुव्यवस्था संपली म्हणणं योग्य नाही. वैयक्तिक वैमन्स्यातून घडलेली घटना आहे. तथापि यासंदर्भातील बंदुका, लायसेन्स देताना काय खबरदारी घेतली पाहिजे याचा विचार राज्य सरकार करेल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

काल ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाली. त्यानंतर आरोपी मॉरिस यानं देखील स्वत: ला गोळ्या झाडत त्यानं आत्महत्या केली. या घटनेचा राजकारणाशी संबंध जोडणं चुकीचं ठरेल. गेल्या काही वर्षांपासून ते एकत्र काम करत होते. २०२४ मध्येही त्यांचे सोबतचे फोटो समोर आलेले आहेत, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर ज्याच्याकडे विनापरवाना बंदूक आढळली तर ती त्याच्याकडे देखील त्याबाबत चौकशी केली जाईल. काल घडलेली घटना वैयक्तिक वैमनस्यातून घडलीय. याला राजकीय रंग देणं योग्य नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
चार दिवसांपूर्वीच मॉरीस आणि एकनाथ शिंदेंची भेट, पक्षप्रवेशाचं आमंत्रण, संजय राऊत यांचा खळबळजनक दावा

दरम्यान, अजित पवार यांनी देखील अभिषेक घोसाळकर यांच्याबाबत घडलेली घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलं. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणामुळं राजीनामा देण्याची गरज नसल्याचं म्हटलं.
अनेकांना धक्का बसला असेल! LIVE सुरू असताना मॉरिस तीनदा उठला अन् घोसाळकरांवर जीवघेणा गोळीबार
Read Latest Maharashtra News Updates And Marathi NewsSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *