[ad_1]

नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरी कसोटी चौथ्या दिवशी म्हणजेच ५ फेब्रुवारीला संपली. या ५ सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना १५ फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांना या दोन्ही कसोटीदरम्यान बराच वेळ मिळणार आहे. याचाच फायदा घेत इंग्लंडचा संघ रिफ्रेश होण्यासाठी यूएईला पोहोचला आहे. या काळात त्यांच्याकडे क्रिकेट किट नसेल. तर आता इंग्लिश खेळाडू अबुधाबीला गेले आहेत पण या ब्रेकमध्ये भारतीय संघ काय करणार? जाणून घेऊया.

क्रिकेटपासून दूर असणार इंग्लिश खेळाडू

दुसऱ्या कसोटीनंतर इंग्लंडचे खेळाडू ब्रेक म्हणून क्रिकेटपासून काही काळ दूर अबुधाबीला गेले आहेत. याबाबत इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम म्हणाले, ‘हा ब्रेक खूप आरामदायक असणार आहे. तेव्हा जास्त ट्रेनिंग होणार नाही. भारतात येण्याआधी सर्वांनी अबुधाबीमध्ये खूप मेहनत घेतली आहे, कारण ते सगळे आधीच भरपूर क्रिकेट खेळून इथे आले आहेत. आम्ही सतत सराव केला. दोन स्पर्धात्मक कसोटी सामने खेळलो आणि आता या सगळ्यापासून दूर राहण्याची संधी आहे.’

मॅक्क्युलमने सांगितला टीम इंडियाचा प्लॅन

भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना ब्रेक दरम्यान भारतीय खेळाडूंचे ब्रेकमध्ये काय प्लॅनिंग आहे याबाबत विचारले गेले नाही. मात्र, मॅक्युलमने याबाबत माहिती दिली की, भारतीय क्रिकेटपटू त्यांच्या घरी जाणार आहेत. तो म्हणाला, ‘मी राहुल द्रविडशी बोलत होतो आणि त्याने सांगितले की त्यांचे सर्व खेळाडूही घरी जात आहेत. घर आमच्यासाठी थोडं लांब आहे म्हणून आम्ही अबू धाबी निवडलं आहे आणि आम्ही कुटुंबासह प्रवासाचा आनंद घेऊ. मग राजकोटला पोचल्यावर जोमाने सराव करू.’

एका वृत्तानुसार, भारतीय खेळाडू तिसऱ्या कसोटीसाठी १२ फेब्रुवारीला राजकोटला पोहोचतील. इंग्लंडचे खेळाडूही पुढील सोमवारी परतणार असून राजकोटमध्ये सामना सुरू होण्याच्या दोन दिवस आधी त्यांचे सराव सत्र होणार आहे. तिसऱ्या कसोटीसाठी अद्याप भारतीय संघ जाहीर करण्यात आलेला नाही. विराट कोहली, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा असे बडे खेळाडू तिसऱ्या कसोटीत खेळणार की नाही यावर सर्वांच्या नजरा असणार आहेत.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *