[ad_1]

मुंबई- चित्रपट अभिनेत्री आणि रामपूरच्या माजी खासदार जया प्रदा यांना चेन्नई न्यायालयाने ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. रायपेटा, चेन्नई येथे त्यांच्या मालकीच्या चित्रपटगृहातील कर्मचार्‍यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या संदर्भात त्यांना ५ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

हा चित्रपटगृह चेन्नईचे राम कुमार आणि राजा बाबू चालवतात. थिएटर कामगारांना ईएसआय देण्यास व्यवस्थापन अपयशी ठरल्याने समस्या सुरू झाली आणि त्यांनी न्यायालयात धाव घेतली. नंतर, अभिनेत्रीने कर्मचार्‍यांना पूर्ण रक्कम देण्याचे आश्वासन दिले आणि खटला फेटाळण्यासाठी न्यायालयात दाद मागितली.

तथापि, कामगार सरकारी विमा महामंडळाच्या वकिलांनी त्यांच्या अपीलवर आक्षेप घेतला, त्यानंतर जया प्रदा आणि या प्रकरणाशी संबंधित इतर तिघांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच प्रत्येकाला ५ हजार रुपये दंड भरण्यास सांगण्यात आले.

जयाप्रदा रामपूरमधून दोनदा झाल्या खासदार

जयाप्रदा यांनी समाजवादी पक्षाच्या वतीने रामपूरचे लोकसभेत दोनदा प्रतिनिधीत्व केले आहे. २००४ आणि २००९ मध्ये त्यांनी काँग्रेस उमेदवाराचा पराभव करून रामपूरची जागा जिंकली होती. नंतर सपाने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आणि त्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी बिजनौरमधून आरएलडीच्या तिकिटावर निवडणूक लढवली, पण त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. २०१९ मध्ये जयाप्रदा रामपूरला परतल्या आणि भाजपने त्यांना उमेदवारी दिली. मात्र, यावेळीही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

जयाप्रदा यांची राजकीय कारकिर्द

विशेष म्हणजे रामपूरमधून खासदार राहिलेल्या जयाप्रदा यांची राजकीय कारकीर्द १९९४ मध्ये तेलगू देसम पक्षातून सुरू झाली होती. जयाप्रदा १९९६ मध्ये आंध्र प्रदेशमधून पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून आल्या होत्या. यानंतर २००४ मध्ये त्या समाजवादी पक्षात सहभागी झाल्या आणि दोनदा लोकसभेच्या खासदार झाल्या. त्यांनी राष्ट्रीय लोकदलाकडून लोकसभा निवडणूकही लढवली होती. नंतर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

चाहते अक्षय कुमार अन् पंकज त्रिपाठीच्या OMG 2 चित्रपटाच्या प्रेमात!

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *