[ad_1]

धुळे: शिरपूर तालुक्यातील सांगवी येथे झालेल्या दंगलीत आमदार काशीराम पावरा यांच्या वाहनावर देखील या दगडफेक आणि जमावकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला होता. हा सर्व पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप आमदार काशीराम पावरा यांनी केला आहे. या हल्ल्यामध्ये आमदार काशीराम पावरा हे देखील बाल बाल बचावले आहेत. अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी आदिवासी बांधवांना आमदार काशीराम पावरा यांनी कुठल्याही प्रकारचा उद्रेक न करता सामंजस्याने उद्भवलेले प्रश्न सोडवावे, असे आवाहन केले आहे.
वादानंतर दोन गटांत दगडफेक आणि तणाव; शालेय विद्यार्थ्यांनी एका कृतीतून उघडले समाजाचे डोळे
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात असलेल्या सांगवी गावात हिंसेचा भडका उडाला आहे. संतप्त जमावाने प्रचंड दगडफेक केली. यात पोलीस प्रशासनासह तहसीलदारांच्या गाडीलाही लक्ष्य करण्यात आले आहे. या घटनेत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह १५ जण जखमी झाले आहेत. या प्रकरणात सांगवी पोलिसांनी तब्बल १५०-२०० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि आमदार काशीराम पावरा घटनास्थळी पोहोचले. मात्र, यावेळी आधी आपल्याला न भेटता समोरच्या गटाला भेटल्याचा राग अनावर झाल्याने संतप्त जमावाने आमदार काशीराम पावरा यांच्यासह तहसीलदार आणि पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक केली.

सांगवी गावात एकीकडे तणावपूर्ण वातावरण तर दुसरीकडे मुलांनी ठेवला समाजापुढे आदर्श

यावेळी आमदार काशीराम पवार यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की, सांगली गावात उसळलेली दंगल ही पूर्वनियोजित कट होता, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. कारण त्या ठिकाणी आधीच असलेले दगड आणि इतक्या मोठ्या संख्येत जमा झालेले नागरिक यावरून हा पूर्वनियोजित कट असल्याचा संशय आमदार काशीराम पावरा यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान आमदार काशीराम पावरा यांच्या गाडीचा अक्षरश: चारही बाजूने चक्काचूर या संतप्त जवानाने केल्याचे निदर्शनास आले आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *