[ad_1]

नाशिक: गणेशोत्सव काळात शहरात वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस आणि महापालिकेने शहरातील प्रमुख वाहतूक मार्गांमध्ये बदल केले आहेत. त्यामुळे सिटीलिंकनेदेखील प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी आपल्या प्रमुख वाहतूक मार्गांत बदल केले आहेत. वाहतूक मार्गातील बदल प्रत्येक दिवशी सायंकाळी सहापासून करण्यात येतील, तसेच ऐनवेळी पोलीस प्रशासनाच्या सूचनेनुसार आवश्यक बदलदेखील करण्यात येऊ शकतात. मार्गांसंदर्भात कोणतीही अडचण असल्यास किंवा माहिती हवी असल्यास ८५३००५७२२२ / ८५३००६७२२२ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सिटीलिंकच्या वतीने करण्यात आले आहे.
गणेशोत्सवात खाकीतील विघ्नहर्ते तैनात! नाशिकात ५६० मंडळांना परवानगी; पोलिसांचा चोख बंदोबस्त

बदल करण्यात आलेले मार्ग

– मार्ग क्रमांक १०१ : निमाणी ते बारदान फाटा, मार्ग क्रमांक १०२ बी : तपोवन ते बारदान फाटा, मार्ग क्रमांक १०३ ए : निमाणी ते सिम्बॉयसिस कॉलेज, मार्ग

क्रमांक १९४ : सुकेणे ते सिम्बॉयसिस कॉलेज, १११ : निमाणी ते म्हाडा कॉलनी, ११६: तपोवन ते बारदान फाटा, १२७ ए : तपोवन ते चुंचाळे गाव, १२८ ए : निमाणी ते चुंचाळे गाव. १३१ ए : तपोवन ते गिरणारे, २४५: नाशिकरोड ते त्र्यंबकेश्वर, २४५ ए : नाशिकरोड ते त्र्यंबकेश्वर या मार्गावरील सर्व बसफेऱ्या या निमाणी- दिंडोरी नाका- पेठफाटा- मखमलाबाद नाका- गंगापूर नाका व पुढे आपापल्या नियमित नियोजित मार्गाने मार्गस्थ होतील. शहरात येताना या बस अशोकस्तंभापर्यंत नियमित मार्गाने व पुढे रामवाडी पुलावरून मखमलाबाद नाका- पेठ नाका- दिंडोरी नाका व निमाणीमार्गे मार्गस्थ होतील.

– मार्ग क्रमांक १०४ तपोवन ते पाथर्डी गाव, मार्ग क्रमांक १०४ एस : निमाणी ते शरयूनगर, १०६ ए : निमाणी ते अमृतानगर, १०७ ए : निमाणी ते अंबडगाव, १०९ ए : तपोवन ते सिम्बॉयसिस कॉलेज, १३७ : निमाणी ते जातेगाव या मार्गांवरील सर्व बस निमाणी येथून जुना आडगाव नाका- पंचवटी डेपो कॉर्नर- कन्नमवार पूल- द्वारका- सारडा सर्कल- गडकरी चौकमार्गे जाऊन पुढे आपापल्या नियमित नियोजित मार्गाने मार्गस्थ होतील. शहरात येताना या बस अशोकस्तंभापर्यंत नियमित मार्गाने व पुढे रामवाडी पुलावरून मखमलाबाद नाका- पेठ नाका- दिंडोरी नाका व निमाणीमार्गे मार्गस्थ होतील.

गणेश चतुर्थीचा उत्साह, भाविकांकडून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आरती

– मार्ग क्रमांक १०८ : नवीन सीबीएस ते सुकेणा, मार्ग क्रमांक १३२ : नवीन सीबीएस ते सायखेडा, मार्ग क्रमांक मार्ग क्रमांक १३३ : नवीन सीबीएस ते सय्यद पिंप्री, मार्ग क्रमांक १४४ : नवीन सीबीएस ते मोहाडी, मार्ग क्रमांक १५२ : नवीन सीबीएस ते पिंपळगाव बसवंत, मार्ग क्रमांक १६० ए : नवीन सीबीएस ते कोचरगाव, मार्ग क्रमांक १६३ : नवीन सीबीएस ते भुजबळ नॉलेज सिटी, मार्ग क्रमांक १४७ : नवीन सीबीएस ते मोहाडी या मार्गांवरील सर्व बस सायंकाळी सहा वाजेनंतर निमाणीपासून सुटतील व निमाणीपर्यंत येतील.

– मार्ग क्रमांक १२९ ए : निमाणी ते भगूर, मार्ग क्रमांक १३० ए : निमाणी ते भगूर, मार्ग क्रमांक १४६ ए : निमाणी ते सिन्नर, मार्ग क्रमांक १४८ ए : निमाणी ते भैरवनाथनगर, मार्ग क्रमांक १६६ ए : निमाणी ते नाशिकरोड रेल्वे स्टेशन, मार्ग क्रमांक २०८ : ओझर बसस्थानक ते नाशिकरोड, मार्ग क्रमांक २१० : दिंडोरी ते नाशिकरोड, मार्ग क्रमांक २४३ : बोरगड एअरफोर्स गेट ते नाशिकरोड, मार्ग क्रमांक २४४ : बोरगड ते नाशिकरोड रेल्वे स्टेशन, मार्ग क्रमांक २४७ : मोहाडी स्टँड ते नाशिकरोड डेपो, मार्ग क्रमांक २६० : मखमलाबाद ते नाशिकरोड, मार्ग क्रमांक २६३ : भुजबळ नॉलेज सिटी ते नाशिकरोड, मार्ग क्रमांक २६६ ए : तपोवन ते नाशिकरोड या मार्गांवरील सर्व बस निमाणी येथून जुना आडगाव नाका- पंचवटी डेपो कॉर्नर- कन्नमवार पूल- द्वारका व पुढे आपापल्या नियमित नियोजित मार्गाने मार्गस्थ होतील. नाशिकरोडकडून येताना द्वारका- सारडा सर्कल- गडकरी चौक- सीबीएस- अशोकस्तंभापर्यंत पुढे रामवाडी पुलावरून मखमलाबाद नाका, पेठ नाका, दिंडोरी नाका व निमाणीमार्गे मार्गस्थ होतील.
विसर्जन मार्गावर वाहनांना प्रवेशबंदी; संभाव्य कोंडी टाळण्यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून वाहतुकीत बदल
– क्रमांक २०१ : नाशिकरोड ते बारदान फाटा, मार्ग क्रमांक २०२ : नाशिकरोड ते बारदान फाटा, नाशिकरोड ते बारदान फाटा २०३ : नाशिकरोड ते सिम्बॉयसिस कॉलेज, सिम्बॉयसिस कॉलेज २११ : नाशिकरोड रेल्वे स्टेशन ते आशीर्वादनगर, सिम्बॉयसिस कॉलेज २३८ : नाशिकरोड ते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सिम्बॉयसिस कॉलेज २४२ : नाशिरोड रेल्वे स्टेशन ते गंगापूर गाव मार्गावरील बस नाशिकरोडकडून येताना द्वारका- सारडा सर्कल- गडकरी चौक व पुढे आपापल्या नियमित नियोजित मार्गाने मार्गस्थ होतील. तसेच जाताना सिव्हिल- मोडक सिग्नल- गडकरी चौक- सारडा सर्कल व चौक व पुढे नियमित नियोजित मार्गाने मार्गस्थ होतील.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *