विशाखापट्टणम: भारत आणि इंग्लंड विरुद्ध खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शुभमन गिलची शांत असलेली बॅट अखेर तळपली आहे. दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात शुभमनची शानदार फलंदाजी पाहायला मिळाली. शुभमनने १२३ चेंडूत शानदार शतक झळकावले आहे. या शतकी कामगिरी दरम्यान गिलने २ षटकार आणि १२ चौकार लगावले आहेत. शुभमनच्या कसोटी कारकिर्दीसाठी हे शतक महत्त्वाचे ठरले आहे कारण बऱ्याच काळापासून गिलची बॅट शांत आहे. शुभमन गिलने १३ डावांनंतर ५२ चेंडूत पहिले अर्धशतक झळकावले. भारत दुसऱ्या डावात फलंदाजीला आला तेव्हा तिसऱ्या दिवशीचे दोन्ही सलामीवीर रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी २८ धावांच्या पुढे खेळायला सुरुवात केली. पण जेम्स अँडरसनने प्रथम रोहितला एका शानदार चेंडूने क्लीन बोल्ड केले आणि त्यानंतर दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात द्विशतक झळकावणारा यशस्वीही जेम्स अँडरसनच्या चेंडूवर बाद झाला. भारताचा दुसरा डाव तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या शुभमन गिलसाठी करा किंवा मरो असा होता. दोनदा आऊट होण्यापासून वाचत अखेरीस शुभमनने शतकी कामगिरी करत त्याच्यावर टीका करणाऱ्यांची बोलती बंद केली आहे. शुभमनने किफायतशीर गोलंदाजी करणाऱ्या इंग्लंडच्या रेहान अहमदच्या एका षटकात १४ धावा कुटल्या. १ षटकार आणि २ चौकार लगावत त्याने मेडेन ओव्हर टाकणाऱ्या रेहानची चांगलीच शाळा घेतली. तिसऱ्या क्रमांकावर पहिले शतक तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या गिलसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता. कारण गेल्या १२ डावात त्याच्या बॅटमधून एकही अर्धशतकही आले नव्हते. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावातही तो केवळ ३४ धावा करून बाद झाला. त्यानंतर गिलवर बरीच टीका होत होती आणि चाहते त्याला संघातून काढून टाकण्याची मागणी करत होते. पण आता इंग्लंडविरुद्धच्या कठीण परिस्थितीत गिलचे हे शतक त्याच्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देणारे आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *