[ad_1]

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघातील युवा विकेटकीपर आणि फलंदाज ईशान किशन सध्या चर्चेत आहे. ईशान भारतीय संघातून बाहेर आहे. त्याने नोव्हेंबर २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरची टी-२० मालिका खेळली होती. त्यानंतर भारतीय क्रिकेट बोर्ड आणि संघ व्यवस्थापनाला ईशान किशन आणि त्याच्या पुढील नियोजनाबद्दल काहीच माहिती नाही.

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी ईशानला देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला होता. पण ईशानने हा सल्ला काही ऐकला नाही. तो झारखंडकडून रणजी ट्रॉफी न खेळता वडोदरा येथे हार्दिक पंड्या सोबत सराव करत असल्याचे समोर आले. भारतीय संघाकडून न खेळणारे आणि फिटनेसची कोणतीही अडचण नसलेल्या खेळाडूंना बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेट खेळ नाही तर कारवाई करू असा इशारा दिला.

जे खेळाडू फिट आहे त्यांना देशांतर्गत क्रिकेट खेळणे सक्तीचे असल्याचे बोर्डाने स्पष्ट केले. बीसीसीआयच्या या कठोर भूमिकेनंतर ईशान किशनने आयपीएलच्या आधी होणाऱ्या डीवाय पाटील स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बराच काळ क्रिकेट खेळल्यामुळे ईशानला कुटुंबाला वेळ देता आला नव्हता, म्हणून त्याने ब्रेक घेतलाय. ईशानने यामुळेच रणजी ट्रॉफीत भाग घेतला नाही. पण आता तो कमबॅकसाठी तयार आहे.

गेल्या काही दिवसांपासून ईशान किशन या गोष्टीमुळे चर्चेत आला होता. असेही एक वृत्त समोर आले होते की त्याच्या केंद्रीय करारावर परिणाम होऊ शकतो. बीसीसीआय त्याला केंद्रीय करारातून बाहेर करू शकते. कारण तो दिर्घ काळापासून भारतीय संघापासून दूर होता. त्याच बरोबर देशांतर्गत क्रिकेट खेळत नाहीय. सध्या ईशान बोर्डाच्या सी गटात आहे. त्याला वर्षाला १ कोटी रुपये मिळतात.

भारतीय क्रिकेटमधील मोठी बातमी: ईशान किशनवर BCCI नाराज, रणजी ट्रॉफीला दुय्यम स्थान देणाऱ्यावर होणार कारवाई

काही दिवासांपर्यंत ईशान भारतीय संघाच्या तिनही फॉर्मेटमध्ये खेळत होता. त्याने दोन कसोटी ७८, २७ वनडेत ९३३ आणि ३२ टी-२० मध्ये ७९६ धावा केल्या आहेत. वनडेत १५, टी-२० मध्ये १६ विकेट घेतल्या आहेत. वनडेमध्ये वर्ल्डकपमधील अफगाणिस्तानविरुद्धची मॅच तर टी-२० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरची मॅच तो खेळला होता.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *