[ad_1]

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात बंदिस्त घर फोडून दागिणींच्या वाढलेल्या चोर्‍या व दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने दापोली परिसरात फिरत असलेले भामटे यामुळे नागरिकांनी सावध राहणे गरजेचे झाले आहे. दापोली शहर जवळ गिम्हवणे गजानन महाराज नगर क्रमांक तीन या दुबळेवाडी परिसरा जवळ तब्बल २ लाख ४० हजारांची सोन्याच्या दागिऱ्यांची चोरी झाली आहे. खेड शहरात झालेल्या घरफोडीत तब्बल १ लाख ६८ हजार ५४० रुपये किमतीचा महत्त्वाचा ऐवज चोरी करण्यात आली असून यामध्ये सोन्याचे दागिन्यांचाही समावेश आहे. या सगळ्या प्रकारांमध्ये अलीकडे वाढ झाली आहे. रत्नागिरी पोलिसांसमोर चोऱ्यांच्या तपासाचं मोठ आव्हान आहे. अशातच आता पॉलिश करण्याच्या बाहण्याने फिरणारी कोणती टोळी सक्रिय आहे का? असाही संशय आता व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या सणासुदीच्या दिवसात नागरिकांनी कमालीची सावधानता बाळगणे आवश्यक आहे.

जिल्ह्यात दापोली शहराजवळील गिम्हवणे येथे सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देतो अशी बतावणी करून सोन्याचे दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने आले. त्यानंतर या दागिन्यांच्या वजनात घट झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दागिने पॉलिश करून देऊन, पैसे घेऊन ही व्यक्ती पसार झाली.

मात्र ज्या कुटुंबाने हे दागिने पॉलिश करण्यासाठी दिले होते त्यांना शंका आल्याने या दागिन्यांचे वजन करण्यासाठी त्यांनी दापोली येथील प्रसिद्ध असलेल्या सोन्याच्या समर्थ ज्वेलर्स सोन्याच्या पेढीवर दागिने वजन करण्यासाठी नेले. त्यावेळी दागिन्यांच्या असलेल्या वजनामध्ये घट झाल्याचे स्पष्ट झाले. त्याचवेळी आपली फसवणूक झाल्याचे या कुटुंबातील लोकांच्या निदर्शनास आले. याची माहिती दापोली पोलिसांना देण्यात आली आहे.

मात्र या प्रकरणी संबंधित कुटुंबाकडून अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. समर्थ ज्वेलर्सचे आनंद वैशंपायन यांनी सांगितले, घरी दागिने पॉलिश करून देणारे आल्यास त्यांना दागिने देऊ नका. पॉलिश करण्यासाठी जो द्रव पदार्थ वापरला जातो त्यात सोने अल्प स्वरूपात काही ग्रॅम विरघळते व त्यानंतर दागिन्याचे वजन केले असता हा फरक कळतो. त्यामुळे असे कोणी फिरस्ते आल्यास त्यांच्याकडे दागिने अथवा संशयित आढळल्यास त्यांना आपल्या कंपाउंडमध्ये किंवा घरात घेऊ नये, असेही आवाहन दापोली पोलिसांनी केले असून अशा कोणत्याही व्यक्ती आढळल्यास त्याची तात्काळ माहिती दापोली पोलिसांना द्यावी असेही आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *