पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलच्या कामाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी त्यांनी पुणे विमानतळ नवीन टर्मिनलच्या कामसंदर्भात माहिती दिली. याशिवाय मुंबईत काल झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणावर आणि पुण्यातील वाढती गुन्हेगारी या मुद्यांवर भाष्य केलं. अभिषेक घोसाळकर यांच्यावर झालेला गोळीबार दुर्दैवी असल्याचं ते म्हणाले. दुसरीकडे अजित पवार यांनी पुण्यातील गुंडांचं रील व्हायरल झाल्याबाबत प्रश्न विचारला असता अजित पवारांनी पोलिसी खाक्या दाखवून कंट्रोल करायला लागेल, असं म्हटलं.

अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणावर काय म्हणाले..

काल घडलेली घटना चुकीची घडलेली आहे, अशा घटना महाराष्ट्रात घडता कामा नये. व्हिडिओ पाहिला तर अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस नरव्होना गप्पा मारताना दिसतात, दोघांचं संभाषण ऐकल्यावर ओळख चांगली आहे, असं दिसतंय. मात्र, या प्रकरणाची नीट चौकशी व्हायला हवी. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. विरोधक या प्रकरणातून सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना निमित्त मिळालेलं आहे, असंही अजित पवार म्हणाले.

पुणे पोलिसांनी गुंडांची ओळख परेड घेऊन सूचना दिल्यानंतरही निलेश घायवळ याचं एक रील व्हायरल झालं होतं. याबद्दल विचारलं असता अजित पवार यांनी पुण्यात पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा करणार आहे. एवढं करुन पुन्हा कुणाची मस्ती असेल तर ती पोलिसी खाक्या दाखवून ती कंट्रोलमध्ये आणावी लागेल. कायदा सुव्यवस्था राबवून गुंडांच्या बाबतची भीती लोकांच्या मनातून गेली पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.

खरंच त्यांची शेवटची निवडणूक असेल का मला माहीत नाही! अजित पवारांची बारामतीत टोलेबाजी

उल्हासनगर गोळीबार प्रकरणात पोलिसांचं कौतुक केली पाहिजे, कारण गोळीबाराचा आवाज ऐकून पोलीस आत गेले. दोन पोलिसांनी ते नियंत्रणात आणलं, त्यांना पकडलं, जो जखमी होता त्याला हॉस्पिटलला नेलं, दुसरा एक जण गोळीबार करणार होता त्याला रोखलं, असं अजित पवार म्हणाले.

पुणे विमानतळाच्या कामाची पाहणी

अजित पवारांनी पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनच्या कामाची पाहणी केली. यानंतर ते म्हणाले की, आपल्या महाराष्ट्रात, पुण्यात देशात वेगवेगळ्या प्रकारची काम सुरु आहेत. पुणे विमानतळाच्या कामाची पाहणी करण्यासाठी आलो होतो. आम्ही पाहणी केली असून सध्याची क्षमता कमी पडत होती. गिरीश बापट हे खासदार असताना त्यांनी या टर्मिनलसाठी प्रयत्न केले, असं अजित पवार यांनी सांगितलं.
उल्हासनगर पोलीस ठाण्यातील गोळीबार प्रकरणात भाजप आमदार गणपत गायकवाड यांना अटक, वाद नेमका कशातून सुरु झाला?

पुण्यातील महत्त्वाची ठिकाणं या ठिकाणी दाखवण्यात आली असून महाराष्ट्राचा ठसा या ठिकाणी जाणवत आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दाखवणारं चित्र रेखाटण्यात आलं आहे, असं अजित पवार म्हणाले. पुण्याच्या नव्या टर्मिनलवरुन वर्षाला १ कोटी २० लाख प्रवासी येऊ जाऊ शकतात, अशी व्यवस्था आहे. जुन्या टर्मिनलचं नुतनीकरण देखील करण्यात येईल. माझ्या पुण्याच्या प्रवाशांना चांगली सेवा मिळेल. १० विमानं विमानतळावर उभी राहतील. १० विमानं पुरेशी आहेत, असं अजित पवार म्हणाले.

सध्या दोन आंतरराष्ट्रीय विमानं पुण्यातून जातात. सिंगापूर आणि दुबईला जातात. देशांतर्गत बाबींसाठी काऊंटरचा वापर करण्याबाबत प्रयत्न करु, असं अजित पवार म्हणाले. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येईल. सगळं ऐसपैस करण्याचा प्रयत्न आहे. नव्या टर्मिनलचं काम दर्जेदार झालेलं आहे, असं अजित पवार म्हणाले. नरेंद्र मोदी १९ तारखेला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. पुणे टर्मिनल, पुणे मेट्रोच्या चार स्थानकांच्या उद्घाटनं करण्याचा प्रयत्न आहे, असंही त्यांनी सांगितलं.
अजित पवारांना बॅनरद्वारे डिवचणं महागात पडलं, पुणे पोलिसांची शरद पवार समर्थक संदीप काळेंवर कारवाई, कारण…
Read Latest Maharashtra News Updates And Marathi NewsSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *