[ad_1]

मुंबई : ‘मोदीची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी’, असा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी लोकसभेत प्रस्तावाला उत्तर देताना दिला होता. पंतप्रधानांच्या शब्दावर ज्यांनी विश्वास ठेवला ते आज खरंच मालामाल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी १० ऑगस्ट रोजी शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचा मंत्र दिला होता. संसदेत दिलेल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी गुंतवणूकदारांना सरकारी कंपन्यांचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला होता.

तर मोदींच्या भाषणापासून आतापर्यंत २२ सरकारी कंपन्यांनी मल्टीबॅगर परतावा दिला. म्हणजे गेल्या सहा महिन्यांत सरकारी कंपनीच्या स्टॉकच्या किमती १०० टक्क्यांपेक्षा जास्त वधारल्या असून या कालावधीत ५६ शेअर्सचा समावेश असलेल्या बीएसई PSU निर्देशांकाचे बाजार मूल्य ६६ टक्क्यांनी वाढून ५९.५ लाख कोटी रुपये झाले आणि या कालावधीत गुंतवणूकदार २३.७ लाख कोटी रुपयांनी मालामाल झाले आहेत.

‘मोदी की गॅरंटी’चा परिणाम
विशेष म्हणजे पंतप्रधानांच्या भाषणापासून गेल्या सहा महिन्यांत एकाही सरकारी कंपनीने नकारात्मक परतावा दिलेला नाही. मागील सहा महिन्याच्या कालावधीत सर्वात वाईट कामगिरी करणारा SBI स्टॉकनेही १२ टक्के तेजी नोंदवली, तर NBCC शेअरमध्ये सर्वाधिक २४९% वाढ झाली असून या कालावधीत IRFC शेअर २२५ टक्क्यांनी वधारले. या व्यतिरिक्त HUDCO, ITI, SJVN, कोचीन शिपयार्ड, MMTC, भेल, REC, मंगलोर रिफायनरी, RVNL, PFS, NMDC, NLC इंडिया, इरकॉन, न्यू इंडिया ॲश्युरन्स अँड जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन शेअरने गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला. तसेच इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब अँड सिंध बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि युको बँकेनेही या कालावधीत गुंतवणूकदारांना दुप्पट नफा करून दिला.

Multibagger Stock: करोडपती करणारा मालामाल शेअर! केवळ सहा महिन्यात भाव तीनपट, तुमच्याकडे आहे का?
मोदी काय म्हणाले होते?
गेल्या वर्षभरात ३५ सरकारी कंपन्यांनी मल्टीबॅगर परतावा दिला असून या कालावधीत IRFC ने सर्वाधिक चार पट गुंतवणूकदारांना खुश केलं. लक्षात घ्या की बीएसई PSU निर्देशांकात समाविष्ट समभागांचाच या अभ्यासात समावेश करण्यात आला असून गेल्या वर्षी लोकसभेत केंद्र सरकारविरुद्धच्या अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना मोदी म्हणाले होते, ‘स्टॉक मार्केटमध्ये स्वारस्य असलेल्या प्रत्येकासाठी हा गुरुमंत्र आहे की ज्या सरकारी कंपन्यांबद्दल हे लोक (विरोधक) अपशब्द वापरात आहेत, त्यांच्यावर तुम्ही डाव लावा. सर्वकाही चांगलं होईल.’

अजून काय हवं… मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या TATA शेअरमध्ये अजून तेजीचे संकेत, वेळीच खरेदी करणार?
मोदींनी आपल्या भाषणात विशेषतः एलआयसी आणि HAL बद्दल चर्चा केलेली त्यापैकी गेल्या सहा महिन्यांत एलआयसीचे शेअर ५६ टक्के आणि HAL चे शेअर ५५ टक्क्यांनी वधारले.

Read Latest Business News

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *