[ad_1]

मुंबई: श्रीराम समूहाचे संस्थापक आणि गणितज्ज्ञ यांनी ६२१० कोटी रुपये दान केले आहेत. त्यांनी स्वत:साठी केवळ लहानसं घर आणि एक साधी, स्वस्त कार ठेवली आहे. त्यागराजन यांच्याकडे मोबाईलदेखील नाही. मोबाईलमुळे लक्ष विचलित होतं असं ते म्हणतात. त्यागराजन यांनी ब्लूमबर्गला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी ७५० मिलियन डॉलरची संपत्ती दान केल्याचं सांगितलं. ही संपत्ती केव्हा दान केली याबद्दलची नेमकी माहिती त्यांनी दिलेली नाही.मी थोडा डाव्या विचारसरणीचा असल्याचं त्यागराजन म्हणाले. समस्यांचा, अडचणींचा सामना करत असलेल्या लोकांच्या आयुष्यातील दु:ख कमी करण्याचा माझा प्रयत्न असल्याचं त्यागराजन यांनी सांगितलं. त्यागराजन यांच्या श्रीराम समूहात १ लाख ८ हजार कर्मचारी काम करतात. त्यागराजन यांनी दान करण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही त्यांनी हा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. गरीब वर्गातील लोकांना कर्ज देण्यात त्यांची कंपनी अग्रेसर आहे.त्यागराजन यांनी स्थापन केलेल्या श्रीराम समूहाचं बाजार भांडवल ९० हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. १९७४ मध्ये चेन्नईत या कंपनीची स्थापना झाली. अत्यल्प उत्पन्न असलेल्यांना कर्ज देऊन त्यांचं जीवनमान उंचावण्याचं काम श्रीराम समूहानं केलं. गरीब आणि गरजूंना बँका सहजा कर्ज देत नाहीत. त्यांच्याकडे कागदपत्रं अपुरी असतात. शिवाय कर्ज बुडण्याचा धोकादेखील अधिक असतो. त्यागराजन यांनी ही गोष्ट हेरली आणि गरजूंना पतपुरवठा करण्यास सुरुवात केली.त्यागराजन अतिशय साधेपणानं जगतात. त्यांना जगण्यासाठी फारसा खर्च येत नाही. त्यामुळेच त्यांनी त्यांची अधिकांश संपत्ती दान केली आहे. त्यांच्याकडे ६ लाख रुपयांची साधी कार आहे. त्यांच्या समूहात काम करणाऱ्यांचा आकडा १ लाखाच्या पुढे आहे. ट्रक, ट्रॅक्टर आणि अन्य वाहनांसाठी कर्ज देण्याचं काम श्रीराम समूह करतो. कर्जफेड केल्याची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्यांना कर्जपुरवठा करण्यात जोखीम नसते हे सिद्ध करण्यासाठी मी कंपनी सुरू केली होती, असं त्यागराजन यांनी मुलाखतीत सांगितलं.आर. त्यागराजन यांचा जन्म तमिळनाडूतील एका संपन्न शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी गणित विषयात पदवी घेतली. कोलकात्यातील भारतीय सांख्यिकी संस्थेत त्यांनी मास्टर डिग्री मिळवली. १९६१ मध्ये ते न्यू इंडिया ऍश्युरन्स कंपनीत रुजू झाले. दोन दशकं त्यांनी अनेक कंपन्यांमध्ये काम केलं. वयाच्या ३७ व्या वर्षी त्यांनी व्यवसाय सुरू केला. आता त्यांच्या समूहात ३० कंपन्या आहेत. त्यागराजन यांच्याकडे मोबाईल नाही. मोबाईलच्या वापरामुळे लक्ष विचलित होतं, एकाग्रता भंग होते, असं त्यांना वाटतं. त्यागराजन एका लहानशा घरात राहतात.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *