विशाखापट्टणम: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अटीतटीच्या दुसरा कसोटीचा चौथा दिवस आज असून आजच निकाल लागण्याची शक्यता आहे. इंग्लंड संघाने लंचपर्यंत ६ विकेटस गमावले आहेत. यात तीन विकेटस आर आश्विनच्या नावे आहेत. अश्विनने कसोटीच्या तिसऱ्या दिवशी बेन डकेटला बाद करत संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला. तर कसोटीच्या चौथ्या दिवशी ऑली पॉपला बाद करत त्याने ४५ वर्षांपासूनचा एक विक्रम मोडित काढला आहे.

भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या डावात २ विकेट घेत ४५ वर्षे जुना विक्रम मोडला आहे. ऑली पॉपच्या विकेटने त्याने हा आकडा गाठला. यानंतर त्याने जो रूटलाही बाद केले. आर अश्विन आता इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे. यापूर्वी हा विक्रम भागवत चंद्रशेखर यांनी ४० वर्षांपूर्वी केला होता, तेव्हापासून हा विक्रम त्यांच्या नावावर होता पण आता अश्विनने त्याचा विक्रम मोडला असून तो स्वतः पहिल्या क्रमांकावर आला आहे.

आर अश्विनचा हा (IND vs ENG 2nd Test) इंग्लंड विरुद्धचा २१ वा कसोटी सामना आहे. आर अश्विनने आतापर्यंत इंग्लंड विरुद्ध ९७ विकेट्स घेतल्या आहेत.

इंग्लंडविरूध्द सर्वाधिक विकेटस घेणारे गोलंदाज

९७ विकेट्स – आर अश्विन
९५ विकेट्स – बीएस चंद्रशेखर
९२ विकेट्स – अनिल कुंबळे
८५ विकेट्स – बीएस बेदी आणि कपिल देव
६७ विकेट्स – इशांत शर्मा

रविचंद्रन अश्विन टीम इंडियासाठी ९७ वा कसोटी सामना खेळत आहे. आतापर्यंत त्याने भारतासाठी १८३ डावात ४९७ विकेट्स घेतल्या आहेत. या काळात अश्विनने ३४ वेळा एका डावात ५ विकेट घेतल्या आहेत, तर त्याने ८ वेळा एका सामन्यात १०पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. आर अश्विन आता कसोटीत ५०० विकेट्स पूर्ण करण्यापासून फक्त ३ विकेट्स दूर आहे.

आतापर्यंत भारताकडून ५०० कसोटी विकेट घेण्याचा पराक्रम केवळ एकाच गोलंदाजाला करता आला आहे. तो म्हणजे अनिल कुंबळे आहे. कुंबळेने भारताकडून ६१९ कसोटी विकेटस कुंबळएच्या नावावर आहेत. त्याचबरोबर क्रिकेटच्या इतिहासात केवळ ८ गोलंदाजांनाच ५०० कसोटी विकेटसचा आकडा गाठता आला आहे. मुथय्या मुरलीधरन हा कसोटी इतिहासात सर्वाधिक ८०० विकेटस घेणारा गोलंदाज आहे.

कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज

मुथय्या मुरलीधरन – ८०० विकेटस
शेन वॉर्न – ७०८ विकेटस
जेम्स अँडरसन – ६९५ विकेट्स
अनिल कुंबळे – ६१९ विकेटस
स्टुअर्ट ब्रॉड – ६०४ विकेटसSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *