[ad_1]

वॉशिंग्टन: श्रीमंत होण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे मोठी लॉटरी लागणे किंवा एखादा खजिना हाती लागणे. अनेकजण असं स्वप्न पाहत असतात की त्यांच्या हाती कुठूनतरी एखादा खजिना लागावा आणि ते श्रीमंत व्हावे. पण, सत्यात असं क्वचितच होतं आणि ज्यांच्यासोबत असं घडतं त्यांना भाग्यशालीच म्हणावं लागेल. एका तरुणीसोबत असाच एक लकी प्रसंग घडला आहे, ज्याची तिने कधी कल्पनाही केली नसेल असं या तरुणीसोबत घडलं.

अमेरिकेत राहणार एक तरुणी आपल्या आईला भेटायसाठी तिच्या जुन्या घरी गेली होती. तिथे तिला असं काही सापडलं जे पाहून तिचे डोळे चकाकले. सध्या सोन्याचे दर हे गगनाला भिडले आहेत. एखादं लहानसं कानातलं किंवा अंगठी करायची म्हटलं तरी आपल्याला किती विचार करावा लागतो, ५०-६० हजार रुपये खर्च करावे लागतात. पण, या तरुणीला एकही रुपया खर्च न करता सोन्याच्या दागिन्यांनी भरलेला बॉक्स सापडला.

मित्राने भेटवस्तू दिली, खाताच चेहरा सुन्न पडला, रुग्णालयात जाताच आठव्या मिनिटाला मृत्यू
डेली मेलच्या रिपोर्टनुसार अमेरिकेत राहणाऱ्या कंटेंट क्रिएटर योलांडा डियाजने टिकटॉकवर तिच्यासोबत घडलेला या प्रसंगाबाबत सांगितलं. ती तिच्या आईला भेटायला त्यांच्या जुन्या घरी गेली होती. मेक्सिकोमधील या घरी तिला सोन्या-चांदीचे अनेक दागिने सापडले. या दागिन्यांमध्ये ब्रेसलेट, कानातले झुमके, अंगठ्या आणि तिच्या नावाच्या लेकलेसचाही समावेश होता. तिने हे सोन्याचे दागिने आपल्या फॉलोअर्सलाही दाखवले. हे तिच्या जुन्या घरात ठेवलेले तिच्या आजीचे जुने दागिने आहेत. या दागिन्यांबद्दल तिला काहीही माहिती नव्हती. तसेच, यात योलांडाला लहान असताना बेबी ज्वेलरी म्हणून मिळालेल्या दागिन्यांचाही यात समावेश आहे.

१०० कोटींचं घबाड, किलोंमध्ये सोनं, नोटा मोजताना थकल्या मशिन, ACB च्या १४ पथकांकडून काम तमाम

योलांडा म्हणाली की दागिने मिळाल्यानंतर ती खूप आनंदी आहे. हे फक्त महागडे दागिने नाही तर जुन्या आठवणी आहेत, ज्यामागे अनमोल किस्से आहेत. योलांडाच्या या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिलं आहे. या दागिन्यांमध्ये असे अनेक दागिने आहेत जे योलांडा परिधान करुन शकते. पण, ती हे दागिने सांभाळून ठेवेल. कारण, ते जुने आणि अमुल्य आहेत.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *