[ad_1]

नवी दिल्ली : आता जडेजा म्हटलं की समोर नाव येतं ते रवींद्र जडेजाचं. जडेजा त्याच्या फिरकीच्या तालावर भल्याभल्या गोलंदाजांना नाचवतो आणि थेट पॅव्हेलियनमध्ये धाडतो. भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने संघाला अनेक सामने जिंकून देत आपले नाव कोरले आहे. तर जडेजासारखंच नाव असलेल्या एका खेळाडूने आता रणजी ट्रॉफीमध्ये खळबळ उडवून दिली आहे. मात्र हा प्रियजित सिंह जडेजा फिरकीपटू नाही तर एक वेगवान गोलंदाज आहे. प्रियजित सिंग जडेजाने सध्या सुरू असलेल्या रणजी ट्रॉफीमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. त्याने १-२ नाही तर १० विकेट घेतल्या, त्यामुळे त्याला ‘सामनावीर’चा बहुमानही मिळाला.

प्रियजीत सिंग जडेजाने पंजाबचा उडवला धुव्वा

एलिट ग्रुप सी मध्ये गुजरात विरूध्द पंजाब यांच्यात सामना खेळवला गेला. या सामन्यामध्ये गुजरात संघाकडून खेळणारा प्रियजीत सिंगने तुफानी कामगिरी केली. त्याने पहिल्या आणि दुसऱ्या डावात ५-५ विकेट्स घेतल्या. पहिल्या डावात त्याने १५.५ षटकांत ६० धावा देत विकेट्स घेतले तर दुसऱ्या डावात ३९ धावा देत ५ विकेट्स घेतले. या कमाल कामगिरीनंतर जडेजा लाईमलाईटमध्ये आला असून त्याचे सर्वच जण कौतुक करत आहेत. प्रियजीक सिंह जडेजाने नुकतेच त्याच्या करियरला सुरूवात केली असून तो एक युवा खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत ३ प्रथम श्रेणी सामने खेळले असून त्यात त्याने १३ विकेट्स मिळवल्या आहेत.

याशिवाय सामन्याविषयी बोलायचं तर, पंजाबने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातने फलंदाजीने सुरूवात करत ३३९ धावा धावफलकात जोडल्या. याच्या प्रत्युत्तरात पंजाब संघ २१९ धावा करत सर्वबाद झाला. त्यानंतर पुढच्या डावात गुजरातने ८ विकेट्स गमावत २९० धावा करत डाव घोषित केला आणि पंजाबसमोर ४११ धावांचे डोंगराएवढे लक्ष्य ठेवले. पंजाबची फलंदाजी बाजू दुसऱ्या डावात पूर्णपणे फ्लॉप राहिली आणि संघ १११ धावा करत ऑलआऊट झाला. यासह गुजरातच्या संघाने २९९ धावांनी हा सामना जिंकला.

भक्ती गुरव यांच्याविषयी

भक्ती गुरव
भक्ती गुरव

“भक्ती गुरव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. क्रीडासोबतच अर्थविषयक बातम्यांमध्ये रस.”… Read More

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *