भरावा लागणार हजारोंचा दंड
आरबीआयने सर्व बँका आणि विनियमित संस्थांना (REs) ३० दिवसांच्या आत ते परत करण्याचे निर्देश दिले असून अन्यथा त्यांना प्रतिदिन ५ हजार रुपये दंड भरावा लागेल.
बँकांसाठी रिझर्व्ह बँकेचा आदेश
आरबीआयने आज म्हणजेच १३ सप्टेंबर रोजी नियमन केलेल्या संस्थांसह (REs) सर्व बँकांसती नवीन निर्देश जारी केले आहेत. ज्यानुसार कर्जाची पूर्ण परतफेड होताच, बँकेने ३० दिवसांच्या आत कर्जदाराला सर्व जंगम आणि स्थावर मालमत्तेची मूळ कागदपत्रे परत करण्याचे सांगण्यात आले आहेत. अन्यथा प्रत्येक दिवसांच्या विलंबासाठी कर्जदाराला प्रतिदिन पाच हजार रुपये दंड म्हणून द्यावे लागणार असे सांगितले आहेत.
ही सूचना वैयक्तिक कर्ज, गृह कर्ज, कार लोन किंवा गोल्ड लोन यासह अशा कर्ज खात्यांना लागू होईल, ज्यासाठी कर्जदाराने त्याची जंगम आणि स्थावर मालमत्ता गहाण ठेवली आहे. कर्जाची परतफेड करूनही कर्जदाराला तारण ठेवलेली कागदपत्रे वेळेत मिळत नाहीत आणि याबाबत ग्राहकांच्या तक्रारी वाढत जात आहेत, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले. परिणामी केंद्रीय बँकेनी नवीन निर्देश जारी केले आहेत.
रिझव्र्ह बँकेने म्हटले आहे की, कर्जाच्या प्रत्येक कर्जाची परतफेड झाल्यावर बँका किंवा वित्तीय संस्थांना ३० दिवसांच्या आत सर्व कागदपत्रे परत करावी लागतील. तसेच कोणत्याही रजिस्ट्रीमध्ये कोणतेही शुल्क दाखल केले असल्यास ते देखील काढावे लागेल.
कागदपत्रे कुठून मिळतील
कर्ज घेणाऱ्यांना जंगम आणि स्थावर मालमत्तेची कागदपत्रे कोठून मिळवायची हा पर्याय असेल. कर्जदार एकतर ही कागदपत्रे कर्ज घेणाऱ्या शाखेतून किंवा त्याच्या सोयीनुसार इतर कोणत्याही शाखेतून कागदपत्रे परत मिळवू शकतो. यासोबतच कर्जाच्या सेक्शन लेटरमध्ये कागदपत्रे कोठून परत केली जातील याचाही उल्लेख असेल असे आरबीआयने म्हटले आहे.
त्याचसोबत रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की सिंगल कर्जदार किंवा संयुक्त कर्जदाराचा मृत्यू झाल्यास मूळ जंगम आणि स्थावर मालमत्तेची कागदपत्रे कायदेशीर वारसांना परत करण्यासाठी RES कडे स्पष्ट व्यवस्था केली जावी. हे धोरण ग्राहकांच्या माहितीशी संबंधित इतर संबंधित धोरणे आणि प्रक्रियांसह, RES च्या वेबसाइटवर पोस्ट केले जावे.