[ad_1]

मुंबई : काँग्रेसचे बडे नेते आणि माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांनी पक्षाचा राजीनामा देत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. सिद्दीकी यांनी एक्स या सोशल मीडिया अकाऊण्टवरुन राजीनाम्याची माहिती दिली. बाबा सिद्दीकी काँग्रेसचा हात सोडणार असल्याची चर्चा गेल्या महिन्याभरापासून सुरु होती. ते अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मात्र हा मोठा धक्का नाही. बापाने राजीनामा दिल्यावर आमदार मुलाची पावलं कुठे पडतात बघावं लागेल, अशा शब्दात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे.

विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

‘टीव्ही९ मराठी’ वृत्तवाहिनीशी फोनवरुन संवाद साधताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, “हा काही मोठा धक्का-बिक्का काही नाही.. बाबा सिद्दीकी जाणार अशी चर्चा महिन्याभरापासून होती. शिवसेना फुटल्यानंतर पक्ष चिन्ह कोणाला मिळेल, हे ठरलेलं होतं. राष्ट्रवादीतून अजितदादा गेले, म्हणजे जनाधार गेला काय, तो पवार साहेबांच्या पाठीशी आहे. अजित पवार कोणाचे तर भाजपचे.. ते राष्ट्रवादीचे नाहीत. तसंच बाबा सिद्दीकी यांना मोठं घबाड मिळत असेल आणि त्यांनी केलेल्या पापातून, चौकशीतून मुक्तता मिळत असेल, तर चांगलं आहे. फक्त गोमूत्र शिंपडून घेत असताना त्यांनी शांत राहावं, हालचाल करु नये, एवढी अपेक्षा ठेवून शुभेच्छा देतो.” अशी स्पष्ट भूमिका विजय वडेट्टीवार यांनी घेतली.

कोण आहेत बाबा सिद्दीकी ज्यांच्या एका शब्दावर अख्खं बॉलिवूड हजर होतं? का असते त्यांच्या इफ्तार पार्टीची चर्चा

“बाबा सिद्दीकी अजित पवारांसोबत जाणार, अजितदादांकडे निवडणूक चिन्ह असलं तरी जनतेला माहिती आहे की ते भाजपच्या इशाऱ्यावर चालणार. भाजपचा अजेंडा राबवण्यासाठी अजित पवारांसोबत जाणार. एखाद्या व्यक्तीने जर धर्मांध शक्तीशी हातमिळवणी केली असेल, तर धर्मनिरपेक्ष विचारांचे मतदार डिस्टर्ब होणार नाहीत” असं मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं.

काँग्रेसला आणखी एक धक्का! बाबा सिद्दीकींचा राजीनामा; ४८ वर्षांचं नातं संपुष्टात
बाबा सिद्दीकी यांचे सुपुत्र झिशान सिद्दीकी हे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर आमदार आहेत. याविषयी विचारले असता, ते म्हणाले की “बापाने राजीनामा दिला म्हटल्यावर मुलाची पावलं तिथेच पडतात, की बाहेर राहतात, मला शक्यता दिसत नाही, मला त्यांच्याशी चर्चा करावी लागेल, आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न करु” ईडीचे समन्स आलेले नेते अभय आणि संरक्षण जिथे मिळतं, तिथे ते जातात. पण काँग्रेस फुटणार नाही, असा आशावादही वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

सिद्दीकी पिता-पुत्र अजित पवार गटात जाण्याच्या चर्चा, जीशान सिद्दीकी काय म्हणाले?

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *