[ad_1]

नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाच्या मधल्या फळीतील फलंदाजांची कामगिरी खूपच निराशाजनक राहिली आहे. त्यामुळे भारताचे माजी दिग्गज सुनील गावस्कर यांनी खेळाडूंना सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालकडून शिकण्याचा सल्ला दिला आहे. जयस्वालने आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यातही त्याने दमदार द्विशतक झळकावले.

जयस्वालच्या फलंदाजीचे कौतुक करताना सुनील गावस्कर म्हणाले की, पहिल्या कसोटीत शतक हुकल्यानंतर जयस्वालने दुसऱ्या कसोटीत द्विशतक झळकावून आपली शिकण्याची क्षमता दाखवून दिली. भारताला अशा फलंदाजाची गरज होती जो मोठे शतक झळकावून डाव सांभाळू शकेल कारण पहिल्या कसोटीप्रमाणेच इतर फलंदाजांनी चांगली सुरुवात करून विकेट गमावल्या होत्या.

गावस्कर म्हणाले, ‘टी-२० क्रिकेटमुळे अनेक वेळा फलंदाजांची खेळण्याची पध्दत बदलते. प्रत्येक वेळी अनोखे शॉट खेळून धावा काढता येतील, असे त्यांना वाटते, पण तसे होत नाही. कसोटी क्रिकेट हा पाच दिवसांचा खेळ आहे आणि अनेक सामने लवकर संपत असले तरी या फॉरमॅटमध्येही मॅच बदलणारे डाव खेळले जाऊ शकतात हे ओली पोप आणि जयस्वाल यांच्या खेळीने दाखवून दिले आहे.

श्रेयस अय्यरची निराशाजनक कामगिरी

टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरची इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांतील कामगिरी खूपच निराशाजनक होती. अय्यरने दोन्ही डावात चांगली सुरुवात केली पण त्याने ठराविक अंतरानंतर विकेट गमावली. त्यामुळेच आता तिसऱ्या कसोटीत तो अडचणीत येणार हे निश्चित मानले जात आहे. शुभमन गिलचीही अशीच अवस्था होती, पण विशाखापट्टणम कसोटीच्या दुसऱ्या डावात शतक झळकावून त्याने पुनरागमन केले, पण त्याआधी शुभमनने आपल्या फलंदाजीने बरीच निराशा केली होती. आता तिसऱ्या कसोटीत राहुलच्या पुनरागमनानंतर रजत पाटीदार की श्रेयस अय्यरला संधी मिळणार की सरफऱाज खान कसोटीत पदार्पण करणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. यासोबतच उर्वरित तीन कसोटीसाठी अद्याप भारतीय संघाची घोषणा झालेला नाही.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *