सणोत्सवात सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करताना त्यावरील हॉलमार्क तपासले पाहिजे. सरकारी एजन्सी BSI ने जारी केलेले हॉलमार्क सोन्याच्या शुद्धतेची हमी असते. जून २०२१ पासून सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आले असून अजूनही बहुतेक सोनार (ज्वेलर) हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकतात, जे अस्सल असण्याची हमी नसते. त्यामुळे सोन्या खरे हॉलमार्किंग कसे ओळखायचे हे तुम्हाला माहित असले पाहिजे. असे केल्याने तुम्ही खऱ्या आणि बनावट सोन्यात सहज फरक करू शकाल.
सोन्याची शुद्धता कशी ओळखायची
जेव्हा तुम्ही एखादे सोन्याचे दागिने खरेदी करता तेव्हा तुम्ही त्यावरील BIS हॉलमार्क तपासा. दागिन्यांवरील हॉलमार्क एक त्रिकोणासारखे दर्शवले जाते. तसेच बिलावरील हॉलमार्किंगची किंमत तपासण्यासाठी तुम्ही बिल ब्रेकअपची विनंती करावी. तुम्ही बिलातील किंमत आणि हॉलमार्किंग केंद्राने ठरवलेली किंमत तपासा. याव्यतिरिक्त कॅरेट देखील तपासणेही महत्वाचे असते. तुम्ही खरेदी केलेले सोने किमान २२ कॅरेटचे असावे. याशिवाय, तुम्ही ज्वेलर्स लायसन्सवर सूचीबद्ध केलेल्या स्टोअरचा पत्ता देखील तपासू शकता.
हॉलमार्किंगअस्सल आहे की नाही असं तपासणार
BIS हॉलमार्कद्वारे सोने अस्सल आहे की बनावट हे लक्षात येते. सोन्याची शुद्धता जाणून घेण्यासाठी तुम्हाला हॉलमार्क चेक करावे लागेल. जर सोन्याचा हॉलमार्क ३७५ असेल तर ते ३७.५% शुद्ध आहे. तसेच जर हॉलमार्क ५८५ असेल तर तुमच्याकडील सोने ५८.५% शुद्ध असेल. त्याचप्रमाणे ७५० हॉलमार्क असल्यास सोने ७५% शुद्ध आणि ९१६ हॉलमार्क असलेले सोने ९१.६% शुद्ध असल्याची हमी देते. तसेच जर सोने ९९० हॉलमार्क केलेले असेल तर ते ९९ टक्के शुद्ध आणि हॉलमार्क ९९९ असल्यास सोने ९९.९% शुद्ध असल्याची हमी देते.
हॉलमार्क असलेले दागिने खरेदी करावे
सोन्यावरील हॉलमार्क त्याच्या शुद्धतेची पुष्टी करते. तसेच हॉलमार्कद्वारे तुम्ही निवडलेले दागिने अस्सल की बनावट आहे हे ओळखू शकता. देशभरात सोन्याच्या दागिन्यांसाठी गोल्ड हॉलमार्किंगचा नियम लागू करण्यात आला असून यानुसार आता दागिने बनवण्यासाठी फक्त २२ कॅरेट सोने वापरावे लागेल जे ९१.६ टक्के शुद्ध असते. नवीन हॉलमार्किंग नियमांमुळे तुम्ही योग्य दागिने खरेदी करू शकाल आणि खरेदी करताना होणारी फसवणूक टाळू शकाल.
अशा स्थितीत आज धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने खरेदीचा विचार करत असाल तर आधी त्यावरील हॉलमार्क नक्की चेक करा जेणेकरून भविष्यात तुम्हाला पश्चात्ताप करावा लागणार नाही.