[ad_1]

नवी दिल्ली : आयकर विभागाने गेल्या काही वर्षांत अनेक किचकट प्रक्रिया सुलभ केल्या आहेत. ग्राहकांना प्रत्येक काम जलद आणि सहज करता यावे यासाठी इन्कम टॅक्स विभाग अनेक सुविधा उपलब्ध करून देत आहे. या वर्षीही विक्रमी आयटीआर दाखल करण्यात आले आहेत, मात्र यानंतरही असे अनेक लोक आहेत जे मुनलाईटिंगमधून कमाई करतात, परंतु त्यातून मिळणारे उत्पन्न त्यांच्या करपात्र उत्पन्नात दाखवत नाहीत. अशा कर्मचाऱ्यांना आयकर विभागाकडून नोटीस पाठवण्यात येत असून अशा कर्मचाऱ्यांवर आयकर विभागाने करडी नजर ठेवली आहे. बरेच लोक आपली कमाई लपवतातपगाराव्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून कमावणाऱ्या लोकांना आयकर विभागाकडून नोटीस पाठवण्यात येत असून आता विभागाने २०१९-२० आणि २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी आयटीआर दाखल करणाऱ्या लोकांची नावे ओळखली जात आहेत. अशा लोकांना सातत्याने नोटिसा पाठवल्या जात असून आत्तापर्यंत, ज्या लोकांना लपविलेल्या उत्पन्नाबाबत नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत त्यात बहुतांश आयटी (तंत्रज्ञान) व्यावसायिक, व्यवस्थापन आणि लेखा व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांनी आयकर विभागापासून आपली साइड इन्कम लपवली आहे. दुसरीकडे, असेही बरेच लोक आहेत ज्यांनी परदेशातूनही कमाई केली आहे. परंतु त्यांच्या पगाराच्या स्वरूपात त्यांनी फक्त नियमित उत्पन्न दाखवले आहेत. २०१९ ते २०२१ या वर्षांमध्ये अशी प्रकरणे सर्वाधिक आढळून आली असून आतापर्यंत विभागाने अशा सुमारे ११०० लोकांना नोटिसा पाठवल्या आहेत. विशेष म्हणजे अशा कर्मचार्‍यांची माहिती ते ज्या कंपन्यांमध्ये काम करत आहेत त्यांनीच विभागाला दिली आहे. यासोबतच परदेशातून झालेल्या सर्व व्यवहारांचा मागोवा घेऊनही आयकर विभागाने लोकांना नोटीस बजावून उत्तरे मागितली आहेत. तसेच करपात्र उत्पन्नावर दंडासह कर भरण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. करोना काळात लोक घरून काम करत होते, त्यामुळे अनेक लोक साइड इन्कम म्हणून वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये रूजू झाले. ही माहिती समोर आल्यानंतर अनेक बड्या कंपन्यांनी मुनलाईटिंग करणार्‍या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *