मलप्पुरम: उत्तर केरळच्या कुट्टीपुरममध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. कित्येक दिवसांपासून उपाशी असलेला एक तरुण मांजरीचं कच्चं मांस खाताना दिसला. वर्दळीच्या भागात असलेल्या बस आगारात शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली. मांस खाताना सापडलेला तरुण आसामच्या धबुरी जिल्ह्याचा रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.बस आगाराच्या जिन्यावर एक तरुण मृत मांजरीचं मांस कच्चं खाताना दिसल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तरुणाची चौकशी केली. तरुण ५ दिवसांपासून उपाशी असल्याचं त्यांना समजलं. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यासाठी जेवण खरेदी केलं. तरुण पोट भरुन जेवला. त्यानंतर तो कोणालाही काहीही न सांगता तिथून एकाएकी गायब झाला.यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांना रेल्वे स्टेशन परिसरात फोन आला. काल अचानक गायब झालेला तरुण रेल्वे स्थानकात असल्याची माहिती त्यांना मिळाली. पोलीस तिथे पोहोचले. तरुण कुठून आला याची पोलिसांनी चौकशी केली. तरुण आसाममधील एका महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. तो कुटुंबाला काहीही न सांगता डिसेंबरमध्ये ट्रेननं केरळला आला.तरुणानं पोलिसांना त्याच्या भावाचं फोन नंबर दिला. त्याचा भाऊ चेन्नईत काम करतो. पोलिसांनी त्याच्याशी संपर्क साधला. तरुणानं दिलेली माहिती खरी असल्याचं त्याच्याशी संवाद साधल्यानंतर पोलिसांच्या लक्षात आलं. वैद्यकीय तपासणीनंतर तरुणाला त्रिशूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तरुणाला कोणत्याही प्रकारचा मानसिक आजार नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्याला लवकरच कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *