गुरुग्राम: गेल्या काही दिवसांपासून तरुणांमधील हार्ट अटॅकचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुग्राम येथील एका प्रोबेशनर उपनिरीक्षकाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. ३० वर्षीय पोलिस उपनिरीक्षक अनिल हे महेंद्रगड अटेलीच्या थनवास या गावातील रहिवासी होते. काहीच महिन्यांपूर्वी ट्रेनिंगनंतर त्यांना गुरुग्राममध्ये पोस्टिंग मिळाली होती.

सदर पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री ड्युटी करुन ते खोलीत जाऊन झोपले होते. रविवारी सकाळी फार उशीर होऊनही ते उठले नाही. त्यामुळे इतर पोलिस कर्मचारी त्यांना उठवायला गेले. तेव्हा त्यांना अनिल हे बेशुद्ध असल्याचं दिसून आलं. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

बाईक-कारची धडक, आठ उंच फेकले गेले अन् गाडीच्या काचेवर आदळले; भयंकर अपघातात शेतकऱ्याचा अंत
त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घरी याबाबतची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार ते पूर्णपणे निरोगी आणि तंदरुस्त होते. हार्ट अटॅकने त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्या मृत्यूच्या बातमीने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

यापूर्वीही हरियाणाचे पोलिस निरीक्षक तरुण दहिया यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता. ते फक्त ४५ वर्षांचे होते. त्यांना पोलिस उपअधीक्षक पदावर पदोन्नतीही मिळणार होती. पण, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

पुण्यातील नामांकित वकिलांसोबत शांत डोक्याने प्लॅन; डोळ्यांदेखत ‘रेकी’ करुन साथीदारांनी मोहोळचा काटा काढला

तर हरियाणाच्याच पानीपत जिल्ह्यात गेल्या वर्षी ५२ वर्षीय पोलिस उपअधीक्षक जोगिंदर जेसवाल यांना जिममध्ये व्यायाम करत असताना हार्ट अटॅक आला होता. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *