[ad_1]

कल्याण : जमिनीच्या वादातून अंबरनाथ हिल लाइन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आलेले भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे पुत्र वैभव गायकवाड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यात वाद झाला. या वादातून आमदार गणपत गायकवाड आणि त्यांचा खाजगी अंगरक्षक हर्षल केणे यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या दालनातच महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या प्रकरणी आमदार गायकवाड यांच्यासह हर्षल केणे आणि संदीप सरवणकर या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमदार गणपत गायकवाड यांनी एकूण सहा गोळ्या झाडल्या होत्या. या गोळीबारात जखमी झालेल्या महेश गायकवाड यांना ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. कल्याण डोंबिवलीचे खासदार आणि मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी महेश गायकवाड यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

भाजप-शिंदे गटात भडका, गोळीबारानंतर गणपत गायकवाड यांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

महेश गायकवाड कोण आहेत?

महेश गायकवाड हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख आहेत. कल्याणमधील सामाजिक कार्यात गायकवाड यांचा सहभाग असतो. महेश गायकवाड यांच्यासाठी लावलेल्या एका बॅनरवर त्यांचा ‘भावी आमदार’ असा उल्लेख करण्यात आला होता.

गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यात पूर्वीपासून राजकीय वाद सुरु आहे. विविध कारणांवरुन दोघांमध्ये आधीही खटके उडाले आहेत.

निवडणुकांसाठी गुंडांना जामिनावर सोडलं; रामावर हक्क सांगता, तर कायद्याचं राज्य कधी? राऊतांचे फडणवीसांना सवाल

गणपत गायकवाड कोण आहेत?

गणपत गायकवाड हे कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदारपदी निवडून आले आहेत. गणपत गायकवाड पूर्वी रिक्षा चालक होते. याशिवाय त्यांचा केबलचाही व्यवसाय होता. मात्र त्यांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश करत अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली. कल्याणमध्ये त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे.

उल्हासनगर पोलीस ठाण्यातील गोळीबार प्रकरणात भाजप आमदार गणपत गायकवाड यांना अटक, वाद नेमका कशातून सुरु झाला?
पहिली विधानसभा निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून लढवली होती. मात्र आमदारकी मिळाल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गायकवाड हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे फडणवीस त्यांच्यावर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

कायदा कोणीच हातात घ्यायचा नाही, फडणवीसांशी बोलणार; गणपत गायकवाड प्रकरणी अजित पवारांची प्रतिक्रिया

Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *